मानस आणी प्लास्टिक पिशवी यावर संवाद लेखन
Answers
Answer:
भारतातही प्लॉस्टिक क्रांती स्वीकारली गेली. अगदी खेडय़ापाडय़ांतही झपाटय़ाने प्लास्टिक पोचले आणि हंडे-कळशीही रंगीबेरंगी प्लास्टिकच्या दिसू लागल्या.
Explanation:
hope it's help you ✌️✌️
Answer:
एकदा एक माणूस आणि एक प्लास्टिक पिशवी एकमेकांशी संवाद साधत असतात. त्यांच्यात झालेला संवाद पुढील प्रमाणे-
माणूस: काय प्लास्टिक राव, आज काल जिकडेतिकडे तुमचीच चर्चा आहे.
प्लास्टिक : अहो दादा, शेवटी तुम्हीच मला बनवलं. जे आहे ते तुमच्या मुळेच आहे.
माणूस: हो. पण खूप कमी वेळात खूपच जास्त प्रसिद्ध झालात तुम्ही प्लास्टिक राव.
प्लास्टिक: हो दादा. माझे फायदे तेवढे आहेत. मी इतर धातूंपेक्षा स्वस्त आणि जास्त टिकावू आहे. माझ्या मध्ये वेगवेगळे रंग आहेत, वेगवेगळे प्रकार आहेत या सर्व गोष्टींमुळे आजकालच्या लोकांना मी खूपच जास्त आवडायला लागलो आहे.
माणूस : तुमचे अनेक फायदे आम्हाला माहित आहे परंतु तुमच्या वाढलेल्या वापरामुळे आमच्या पर्यावरणाला सुद्धा खूपच जास्त धोका होत आहे. प्लास्टिक राव तुमचं सहजासहजी विघटन होत नाही. तुमचे फायदे आहेत पण नुकसानही तितके आहे.
प्लास्टिक : परंतु त्यातही माणसांचीच जास्त चूक आहे. माणसांना सर्व समजत असूनही ते प्लास्टिकचा म्हणजे माझा वापर टाळत नाही. शासनाने एवढे कायदे केले आहेत तरीही त्यांचे पालन काटेकोरपणे होत नाही. या सगळ्यात मध्ये माणसाची चूक आहे.
माणूस: ते पण खरं आहे. परंतु आम्ही आमच्या पर्यावरणाला वाचवण्यासाठी प्लास्टिकचा म्हणजे तुमचा वापर कमी करु अशी आम्ही आज प्रतिज्ञा घेतो.