मी नदी झाले तर essay in marathi
Answers
Answer:
essay ka topic hi samajh me nhi aa raha he.........
⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀मी नदी झाले तर
बऱ्याच काळाने मी गावी जात होतो. गेल्या गेल्या नदीत पोहायला जायचं, पूर्वीसारखी खूप मजा करायची असे बेत मनात चालले होते. मनात आलं, एकदा नदीच्या उगमापासूनnतिच्या काठाकाठाने खूप दूरपर्यंत जाऊन यावं, किती बहार येईल । वाटलं, त्यापेक्षा मीच नदी बनलो तर...? थेट डोंगरात सुरुवात करून अनेक प्रदेशांतून रमतगमत समुद्रापर्यंत जायचं! किती सुंदर कल्पना !
मी नदी बनलो तर... मी डोंगरमाथ्यावरून खूप खोल दरीत उडी मारीन, डोगरातून सोप्या सोप्या मार्गाने येणारच नाही. माणूस असल्याने आता मला जाता येत नाही अशा अडचणीच्या जागांवरून, झाडाझुडपांतून, या कातळावरून त्या खडकावर उड्या मारत उसळ्या घेत खाली येईन. तिथून रमतगमत समुद्रात. समुद्रात गेल्यावर तर मज्जाच मज्जा। तन्हेत-हेचे लहानमोठे हजारो रंगीबेरंगी मासे पाहीन, त्यांच्या अंगांवरून हात फिरवून पाहीन. मला भीतीच वाटणार नाही! कधी समुद्राच्या महाकाय लाटांबरोबर दंगामस्ती करीन; तर कधी समुद्राच्या तळात असलेल्या खोल भुयारांतून, गुहांमधून एकटाच हिंडेन ।
मी नदी बनलो तर एक गोष्ट नक्की करीन. डोंगरातून उतरताना उड्या मारत उसळत येईन, तसा गावात आल्यावर मात्र धावणार नाही. गावातून मी संथपणे वाहत जाईन. माझ्या पात्रात मी लहानमोठे डोह निर्माण करीन, मग माझ्यासारखीच खूप मुलं येऊन मनसोक्त इंबतील, पोहतील. मला त्यांच्याशी खेळायला मिळेल. मी माझ्या काठावर मोठमोठी खूप झाडं वाढवीन. जाणारे येणारे वाटसरू मग घटकाभर माझ्या काठाशी विसावा घेतील व पुढे जातील. संध्याकाळी अनेक लोक काठावर येतील. माझ्या प्रवाहाचं सौंदर्य न्याहाळत आनंदाने गप्पा मारतील आणि तृप्त होऊन घरी परततील. मी नदी बनलो तर नदीच्या काठावरील सर्व परिसर 'सुजल सुफल' बनवीन. मी आता हे मनोराज्य रंगवीत आहे खरं. पण याच्या विपरीत घडलं तर? लोकांनी झाडंपेडं तोडून टाकली, पर्यावरण उद्ध्वस्त केलं तर? तर मग, मी आता कल्पना करतोय ते माझं रमणीय रूप शिल्लक राहणारच नाही. पावसाळ्यानंतर लगेचच माझं पात्र कोरडे ठणठणीत होईल. काठावरची झाडं सुकून मरून जातील. लोक केवळ घाण करण्यासाठीच माझ्या पात्राचा उपयोग करतील. सांडपाणी सोडतील. घाण पाण्याची डबकी साचतील. दुर्गंधी पसरेल. कदाचित रोगराई पसरेल. मग लोक मलाच शिव्याशाप देतील, माझ्याकडे कोण फिरकणारसुद्धा नाही । बाप रे । नकोच ते नदी होणं ।