मी नदी झाले तर निबंध मराठी मध्ये
Answers
मी नदी. माझा जन्म हिमालयाच्या उंच शिखरावर झाला. लहानपणी मी फारच अवखळ होते. कधी एका जागेवर न थांबता मागे पुढे न पाहता एकसारखी हुंदडायचे दगडगोटे झाडेझुडपे यांच्यामधून रस्ता काढत फक्त धावत रहायचे. वाटेतील वेली माझी वाट अडविण्याचा प्रयत्न करत आणि माझ्याशी लपंडावही खेळत पण कुणालाही न सापडता धावत रहायचे.
मला अनेक भाऊ बहिणी येऊन मिळायचे. त्यामुळे माझा वेग वाढतच जात असे. कळसापासून पायथ्यापर्यंत जाताना रस्त्यात अनेक संकटे येत. त्या सर्व संकटांना तोंड देत मी माझे ध्येय गाठत असत. एखाद्या योध्याप्रमाणे मी लढत असत आणि पुढे जात असत. नंतर मात्र वाट चालणे मुश्किल होई कारण सपाट रस्त्यांवर शेते, वने असे अनेक अडथळे पार करणे जिकीरीचे होई. त्यांच्याशी सामना करत माझी स्वारी तशीच आपले घोडे दवडत पुढे चालत असत. पण या सर्व प्रवासामध्ये मला माझ्या बहीण भावंडांनी शेवटपर्यंत खूप साथ दिली. आणि मी मैलोनमैल धावत सर्व गावांना माझे शुद्ध जल वाटत राहिले, सर्वांची तहान भागवत राहिले. त्यावर कित्येक हेक्टर जमिनींना आपले पोट भरून घेतले. सर्व शेते माझ्यामुळेच हिरवीगार दिसू लागली. शहरे अन्नधान्याने संपन्न झाली.
शहरातील कारखान्यात देखील माझा बिन बोभाट वापर होत असे. तसेच कारखान्यातील प्रदूषित रसायन मिश्रित पाणी माझ्या पात्रात सोडले जाऊ लागले आणि मला त्यामुळे खूप काही सहन करावे लागले, माझे पात्र प्रदूषित होत गेले. भगवान शंकराच्या माथ्यावर देखील स्थान मिळवलेली मी आता दूषित बनले. माझ्या पात्रात जगणारे जलचर प्राणी, वनस्पती मरण पावू लागले पण माणसाला याची काहीच चिंता नाही. माणसांना फक्त पाण्याचा निर्धोक वापर करण्याचे तंत्रज्ञान माहिती आहे, त्यामुळे हेच दूषित पाणी ते शुद्ध करून पितात. मग त्यांना दुसऱ्यांची काय फिकीर? लोक आपली जनावरे, कपडे धुवून प्रदूषणात आणखीनच भर टाकत त्यामुळे माझ्यातून अनेक रोगजंतू वाहू लागले व बरेच निष्पाप लोक त्या रोगांना बळी पडू लागले.
मनुष्याला आपल्या बुद्धीचा खूपच अभिमान आहे त्यामुळे जलशुद्धीकरण, तसेच अनेक प्रकल्प वगैरे केले जातात पण तेच प्रदूषण न करता सर्वांना शुद्ध पाण्याचा उपभोग घेऊ दिला तर जलचर तरी सुखाने जगतील पण पैसे कमवण्याच्या हव्यासापोटी माझ्या पत्राचे व पाण्याचे प्रदूषण करत आहेत. गणपती विसर्जनासाठी आल्यानंतर तसेच इतर वेळीही निर्माल्य माझ्या प्रवाहामध्ये सोडून देता आणि मला दूषित करता. कचरा सुद्धा तुम्ही माझ्या पात्रात टाकतात. काही जण तर वाहने सुद्धा माझ्या पात्रात धुतात खरं तर मला तुम्ही सर्वचजण खूपच पवित्र मानता पण तुम्हीच माझ्या ह्या पवित्रपणाला डाग लावत आहात.
वाळू व माती माझ्या पात्रातून नेऊन मला कोरडे ठणठणीत करत आहेत. कशी होणार माझी व माझ्या सहवासातील जलचरांची जोपासना? पण हे मनुष्याला केव्हा कळणार, आमच्यावरील हे अन्याय अत्याचार केव्हा थांबणार? आज मनुष्याला सावधान करणे गरजेचे झाले आहे
मला एका गोष्टीचे खूप वाईट वाटते की माझ्या चांगल्या पाण्यात लोक घाण टाकतात. मला गलिच्छ करतात. मी इतके त्यांचे चांगले करते,पण ते माझा श्वास गुदमरला इतकी घाण, फुले, कचरा, आणि सांडपाणी टाकून मला प्रदूषित करतात. तेच पाणी पिऊन मग रोगराईने त्रस्त होतात. त्यांना हे काळात नाही की मी वाहत राहिले तरच त्यांना चांगले पाणी मिळेल. त्यांना कोण सांगणार? मी मूकपणे सहन करते. आणि माझ्या बाबांकडे, आणि शंकराकडे विनवणी करते की त्यांना समजूत येऊ दे नाहीतर माझा संयम संपला तर ह्यांचाच सर्वनाश होईल.
देवा, हि वेळ माझ्यावर आणू नको.
Answer:
माझं रमणीयप शिल्लक राहणारच नाही. पावसाळ्यानंतर लगेचच माझं पात्र कोरडं ठणठणीत होईल. काठावरची शाई सुकून मरून जातील. लोक केवळ घाण करण्यासाठीच माझ्या पात्राचा उपयोग करतील. सांडपाणी सोडतील. घाण पाण्याची डबकी साचतील.nदुगंधी पसरेल. कदाचित रोगराई पसरेल. मग लोक मलाच शिव्याशाप देतील. माझ्याकडे बऱ्याच काळाने मी गावी जात होतो. गेल्या गेल्या नदीत पोहायला जायचं, पूर्वीसारखी खुप मजा करायची असे बेत मनात चालले होते. मनात आलं, एकदा नदीच्या उगमापासून तिच्या काठाकाठाने खूप दूरपर्यंत जाऊन यावं, किती बहार येईल! बाटलं, त्यापेक्षा मीच नदी बनलो तर...? थेट डोंगरात सुरुवात करून अनेक प्रदेशांतून रमतगमत समुद्रापर्यंत जायचं! किती सुंदर कल्पना।
मी नदी बनलो तर... मी डोंगरमाथ्यावरून खूप खोल दरीत उडी मारीन. डोंगरातून सोप्या सोप्या मागनि येणारच नाही. माणूस असल्याने आता मला जाता येत नाही अशा अडचणीच्या जागांवरून, झाडाझुडपांतून, या कातळावरून त्या खडकावर उड्या मारत उसळ्या घेत खाली येईन. तिथून रमतगमत समुद्रात. समुद्रात गेल्यावर तर मज्जाच मज्जा तहेत-हेचे लहानमोठे हजारो रंगीबेरंगी मासे पाहीन. त्यांच्या अंगांवरून हात फिरवून पाहीन, मला भीतीच वाटणार नाही! कधी समुद्राच्या महाकाय लाटांबरोबर दंगामस्ती करीन; तर कधी समुद्राच्या तळात असलेल्या खोल भुयारांतून, गुहांमधून एकटाच हिंडेन !
मी नदी बनलो तर एक गोष्ट नक्की करीन. डोंगरातून उतरताना उड्या मारत उसळत येईन, तसा गावात आल्यावर मात्र धावणार नाही. गावातून मी संथपणे वाहत जाईन. माझ्या पात्रात मी लहानमोठे डोह निर्माण करीन. मग माझ्यासारखीच खूप मुलं येऊन मनसोक्त इंबतील, पोहतील. मला त्यांच्याशी खेळायला मिळेल. मी माझ्या काठावर मोठमोठी खूप झार्ड वाढवीन, जाणारे येणारे वाटसरू मग घटकाभर माझ्या काठाशी विसावा घेतील व पुढे जातील. संध्याकाळी अनेक लोक काठावर येतील. माझ्या प्रवाहाचे सौंदर्य न्याहाळत आनंदाने गया मारतील आणि तृप्त होऊन घरी परततील. मी नदी बनलो तर नदीच्या काठावरील सर्व परिसर 'सुजल सुफल' बनवीन.
मी आता है मनोराज्य रंगवीत आहे खरं. पण याच्या विपरीत घडलं तर? लोकांनी झाडेपेड तोडून टाकली, पर्यावरण उद्ध्वस्त केलं तर? तर मग, मी आता कल्पना करतोय ते कोण फिरकणारसुद्धा नाही! बाप रे। नकोच ते नदी होणं ! मला वाटतं, लोकांचं आधी प्रबोधनच केलं पाहिजे. 'झाडं लावा, झाडं वाचवा' हा संदेश सर्वत्र पोहोचवला पाहिजे. पर्यावरणाचं रक्षण करायला शिकवलं पाहिजे. त्याचं महत्व लोकांच्या मनावर बिंबवलं पाहिजे. मगच नदी होण्याचं स्वप्न पाहू या!