History, asked by Sayra1234, 3 months ago

मानवाची उत्क्रांती कशी झाली​

Answers

Answered by ayanzubair
6

स्तनी वर्गातील नरवानर गणात आधुनिक मानवाचा समावेश होतो. नरवानर गणातील आता अस्तित्वात नसलेल्या पूर्वजांपासून आधुनिक मानवाची उत्क्रांती झाली आहे. मानवाच्या उत्क्रांतीच्या या दीर्घ प्रक्रियेला सु. ६० लाख वर्षांचा कालावधी लागलेला आहे. दोन पायांवर उभे राहून चालणे – हे मानवाचे वैशिष्ट्यपूर्ण लक्षण मानले जाते आणि सु. ४० लाख वर्षांपूर्वी मानवामध्ये ते लक्षण उत्क्रांत झाले. त्यानंतर, आकारमानाने व गुंतागुंतीची संरचना असलेला मेंदू, अवजारांची निर्मिती व वापर, भाषेची क्षमता इ. इतर मानवी वैशिष्ट्ये विकसित झाली. यांखेरीज जटिल सांकेतिक अभिव्यक्ती, कला आणि सांस्कृतिक विविधता इ. प्रगत वैशिष्ट्ये मागील एक लाख वर्षांत विकसित झालेली आहेत.

नरवानर गणातील अगदी प्रारंभिक प्राण्यांपासून आधुनिक मानव (होमो सेपिएन्स) उत्क्रांत होण्याचे टप्पे यांचा बव्हंशी क्रम पुढीलप्रमाणे आहे; नरवानर गणाच्या एका टप्प्यावर होमोनायडिया अधिकुलातील प्राणी कपि (एप) उत्क्रांत झाले. पुढे या अधिकुलाच्या दोन शाखा झाल्या. त्यांपैकी एका शाखेमध्ये गिबन या एकाच प्राण्याचा समावेश होतो. त्यांना लहान कपि म्हटले जाते. दुसऱ्या शाखेच्या प्राण्यांना मोठे कपि (होमिनिडी कुल) म्हटले जाते. पुढे होमिनिडी कुलाची उपकुले झाली. त्यांपैकी अस्तित्वात असलेल्या एका उपकुलात ओरँगउटानांचा (पाँजिडी उपकुल) समावेश होतो आणि दुसऱ्या उपकुलात गोरिलीनी व होमिनीनी या दोन जमाती आहेत. गोरिलिनी जमातीत गोरिला या एकाच प्रजातीचा समावेश होतो, तर होमिनिनी जमातीत चिंपँझी (पॅन प्रजाती) आणि ज्यांना आदिमानव म्हणता येईल अशा उपजमाती येतात. या उपजमातींमध्ये सहेलँथ्रोपस, ऑस्ट्रॅलोपिथेकस, पॅरँथ्रोपस, आर्डिपिथेकस अशा विलुप्त प्रजाती आणि होमो प्रजाती येते. होमो  प्रजातीत सात जाती ओळखल्या गेल्या आहेत. त्यांपैकी होमो सेपिएन्स  ही जाती म्हणजेच आधुनिक मानव आहे.

मानव आणि चिंपँझी यांच्या डीएनएची तुलना केली असता त्यांत ९८·८% सारखेपणा दिसून आला आहे. याचा अर्थ मानव आणि चिंपँझी एकाच पूर्वजांपासून उद्‌भवले असावेत. साधारणपणे ८०–६० लाख वर्षांपूर्वी होमिनिडी कुलातील प्राण्यांची विभागणी चिंपँझी आणि आदिमानव अशा दोन गटांमध्ये झाली. ही उत्क्रांती बव्हंशी आफ्रिका खंडात घडून आली. ६०–२० लाख वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या आदिमानवाचे जीवाश्म आफ्रिकेत सापडले आहेत.

लाखो वर्षांपूर्वीचे सापडलेले मानवसदृश जीवाश्म आणि इतर माहितीच्या आधारे वैज्ञानिकांनी मानवाच्या उत्क्रांतीचे टप्पे केलेले आहेत. तसेच हे जीवाश्म ज्या काळातील आहेत, त्यानुसार मानवाच्या जातींना नावे देऊन मानवाच्या उत्क्रांतीमधील सलगता शोधण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र हे टप्पे अंतिम नाहीत. भविष्यातील संशोधनानुसार त्यात बदल होऊ शकतात.

आदिमानवाच्या १५–२० जाती असाव्यात, हे बहुतेक वैज्ञानिकांनी मान्य केले आहे. मात्र या जाती एकमेकांशी कशा संबंधित होत्या व कोणती जाती विलुप्त झाली याबद्दल वैज्ञानिकांमध्ये एकमत नाही. आदिमानवाच्या जाती कशा ओळखाव्यात आणि ठराविक जातीचे वर्गीकरण कसे करावे, प्रत्येक जातीच्या उत्क्रांतीमध्ये कोणते घटक कारणीभूत झाले व ती विलुप्त कशी झाली, यासंबंधी वैज्ञानिकांमध्ये चर्चा चालू आहे.

Answered by sahilarceus17693
1

Answer:

Hey syara

if u r seriously willing to know my birth date

I'll tell u

this year my birthday will come on on the 9th day of Shravan

Explanation:

can you guess the date in usual calender

ok I'll tell u

it's 31st of AUG

and I don't have TV due to boards

so I use to download Pokemon

Similar questions