'' मानवी जीवनात विज्ञानाचे महत्त्व '' या विषयावर मराठीत निबंध लिहा. (350 शब्द)
Answers
विज्ञानात ज्ञानाला महत्त्वाचे स्थान आहे. तथापि, सर्वच प्रकारच्या ज्ञानाला विज्ञान म्हटले जात नाही - उदा. अध्यात्म.
■■ मानवी जीवनात विज्ञानाचे महत्व■■
आपल्या प्रत्येकाच्या जीवनात विज्ञानाचे महत्वपूर्ण स्थान आहे. खरं तर, आताच्या काळाला विज्ञानाचे काळ म्हटले जाते.
विज्ञानामुळे आपण देशाच्या विविध क्षेत्रांमध्ये प्रगती केली आहे. आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात सुद्धा विज्ञानाच्या आविष्कारांचा वापर केला जातो.
विज्ञानामुळे आविष्कार झालेले यंत्र आपल्या वेळेची बचत करतात. त्यांच्यामुळे आपल्याला एखादे काम करण्यासाठी कमी मेहनत करावी लागते.
या यंत्रांमुळे आपले जीवन सुविधाजनक आणि वेगवान बनले आहे.आज आपण संगणक आणि मोबाईलच्या सहाय्याने घरबसल्या काम करू शकतो,जगातील कुठल्याही व्यक्तीशी संपर्क करू शकतो.
टीव्हीमुळे आपल्याला देशातील विवध घडामोडी लगेच कळतात.एका जागेवरुन दुसऱ्या जागी आपण गाडीच्या सहाय्याने काही वेळातच जाऊ शकतो.
एखादी गोष्ट किंवा घटना अशी का आहे व ती कशामुळे घडते, हे आपल्याला विज्ञानामुळे कळते. विज्ञान आपल्याला आपल्या शरीराची, पर्यावरणाची चांगल्या प्रकारे माहिती देतो.
म्हणून, विज्ञानाचा आपल्या जीवनात महत्वाचा स्थान आहे.