मानवी जीवन व पक्षी जीवन यांच्यातील साम्य स्पष्ट करा
Answers
Answered by
10
अनादी कालापासून प्रत्येक मानवाच्या समोर केव्हा ना केव्हा प्रश्नचिन्हाच्या रूपाने उभी ठाकणारी एकमात्र गोष्ट म्हणजे मानवी जीवन! किती अगणित तर्हांनी जीवनाची ही जटिल वीण सोडविण्याचा प्रयत्न आतापर्यंत झाला आहे. याचा इतिहास पाहिल्यास मन थक्क होऊन जाते. पाश्चात्त्य आणि पौर्वात्य दोन्ही देशात, प्राचीन आणि अर्वाचीन दोन्ही काळात अनेक तत्त्वज्ञ, साहित्यिक कवी आणि शास्त्रज्ञ आपापल्या परीने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.
एखाद्या तत्त्वज्ञान्याच्या प्रज्ञावंत चक्षूद्वारे मानवी जीवनाचा दृश्य पापुद्रा झटकन दरूर केला जातो आणि त्या पलीकडील सत्य एखाद्या तेजस्वी शलाकेप्रमाणे क्षणभरच परंतु लख्ख चमकून जाते. पण तो क्षणच अनमोल ठरतो. कारण वर्षानुवर्षे केलेल्या तपश्चर्येचे ते फलित असते. एखादा प्रतिभावंत साहित्यिक आपल्या उत्तुंग कल्पनाशक्तीच्या साह्याने हां हां म्हणता मानवी मनाच्या बाह्य पृष्ठभागावरून सप्तपाताळात दडलेल्या मानवी मनापर्यंत खोल बुडी घेतो आणि जणू सागरतळी दडलेल्या मौक्तिकांचाच शोध लावून जातो! एखादा मनस्वी कवी अचाट कल्पनांचे पंखे लावून उंच आकाशात अशी काही गरुडभरारी मारतो, की जणू तेथील चंद्र, सूर्य, तारे आपल्याबरोबर पृथ्वीवर आणून मानवी जीवनाच्या खरखरीत वस्त्राला जरतारी किनार लावून त्याचे आगळेच दर्शन आपणांस घडवितो!
एखादा व्यासंगी शास्त्रज्ञ अथक परिश्रमांच्या वेदीवर आपले संपूर्ण जीवन समर्पित करून मनुष्य-जीवनाच्या जटिल रहस्यांचे आपल्या तरल आणि संवेदनशील बुद्धीच्या साह्याने सहज आकलन करण्याचा प्रयत्न करतो, तर कधी कधी रस्त्यावरील कुणीही एक सामान्य माणूस आपल्या उपजत शहाणपणाच्या आधाराने मानवी जीवनाच्या यशस्वी वेध घेतो आणि गुंतागंतीची जीवनगणिते चुटकीसरशी सोडवून टाकतो. यापैकी प्रत्येकालाच मानवी जीवन आपापल्या परीने समजलेले आणि उमजलेलेही असते. त्या प्रत्येकाचाच अनुभव सम्यक् जीवनदर्शन घडवितो असचे म्हणावे लागेल.
परंतु काही व्यक्तींच्या अनेक पदरी व्यक्तिमत्त्वात तत्त्वज्ञांची तळमळ, साहित्यिकाचा जिव्हाळा, कवीची असोशी, शास्त्रज्ञाचा तटस्थपणा आणि सामान्य माणसाची शुद्ध व्यवहारिक उमज यांचे इतके बेमालूम रसायन झालेल असते की त्यांच्याइतके मानवी जीवनाचे तरल, आरपार आणि स्वच्छ दर्शन क्वचितच कुणाला झालेले असेल. त्यांच्या स्फुट लिखाणातून, वागण्याबोलण्यातून त्याचा मनोरम प्रत्यय जाणकाराला प्रतिक्षण येत राहतो. अशा व्यक्तींच्या शुद्ध अस्तित्वाचा साक्षात अनुभवच आपणास अखंड सोबत करणार असतो, यात शंका नाही.
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
प्रचलित...
सर्व पहा 
प्रचलित

मोठी भविष्यवाणी भाजपा मित्र पक्ष एनडीए सत्तेत येणार मात्र नरेद्र मोदी नाहीतर हा नेता प्रधानमंत्री होणार

स्वातंत्र्यदिन आणि आपण

नवे नियम लागू झाल्यास भारतात व्हॉट्सअॅप बंद होणार?

हे फूल वाळतं नाही, घरात ठेवल्याने भाग्य उजळतं

लग्नासाठी योग्य आहे ह्या 3 राशीच्या कन्या

1
Answer:
Which answer has given it is correct answer.
Explanation:
Which answer has given it is correct answer.
Similar questions