मानव नैसर्गिक वन संसाधनावर अवलंबून आहे ते स्पष्ट करा मराठी उत्तर
Answers
Explanation:
मानवाला निसर्गातील उपयुक्त असलेल्या घटकांना किंवा पदार्थांना नैसर्गिक संसाधने म्हणतात. नैसर्गिक संसाधनांमध्ये जमीन, पाणी, हवा, सूर्यप्रकाश इत्यादींचा समावेश होतो. तसेच स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेली खनिजे, खनिज तेल, वनस्पती यांचाही समावेश होतो. जीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी या संसाधनांची गरज असते. निसर्गात उपलब्ध असलेल्या या पदार्थांचा उपयोग सजीव जगण्यासाठी करतात.
नैसर्गिक संसाधने नैसर्गिक संसाधनांच्या वर्गीकरणाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यांचे (१) संसाधनांचे स्रोत, (२) संसाधनांच्या विकासाचे टप्पे व (३) नूतनीक्षम अशा बाबींनुसार वर्गीकरण केले जाते.
संसाधनांचे स्रोत
यांच्या उगमावरून त्यांचे जैव आणि अजैव असे प्रकार आहेत. जैव संसाधने ही जीवावरणातील घटकांपासून (उदा., वने, प्राणी, पक्षी इत्यादींपासून) प्राप्त होतात. यात कोळसा व जीवाश्म इंधन या जैव इंधनांचादेखील समावेश होतो. कारण ती सेंद्रिय पदार्थांच्या कुजण्यापासून तयार होतात. अजैव प्रकारात जमीन, पाणी, हवा, जड धातू (उदा., सोने, चांदी, तांबे, लोह इत्यादी) आणि वेगवेगळ्या खनिजांचा समावेश होतो.