मानवी सुरक्षा थोडक्यात उत्तर लीहा
Answers
Answer:
देशाचे बाह्य धोक्यांपासून संरक्षण करणे हे राष्ट्रीय सुरक्षेचे मुख्य उद्दिष्ट आहे. याउलट मानवी सुरक्षेचे मुख्य लक्ष्य व्यक्तींचे संरक्षण. सुरक्षित देश म्हणजे सुरक्षित लोक असा अर्थ होत नाही. नागरिकांचे परकीय आक्रमणापासून संरक्षण करणे हा व्यक्तीच्या सुरक्षे मधील एक भाग नक्कीच आहे. पण केवळ एवढ्याने व्यक्ती सुरक्षित राहात नाही. गेल्या शतकात परक्या सैन्याने मारल्या पेक्षा कितीतरी अधिक लोक त्यांच्याच सरकारने मारले आहेत. तेवढेच लोक साथीच्या रोगांनी आणि नैसर्गीक आपत्तींमध्ये सापडून मेले आहेत. त्यामुळे लोकांना अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत सुविधा देणे, अन्न सुरक्षा - शुद्ध आणि पुरेसे अन्न उपलब्ध करणे, अशा दोन्ही अर्थांनी अन्न सुरक्षा, शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा पुरवणे, पिण्याच्या पाण्याची आणि सांडपाण्याची व्यवस्था करणे, शुद्ध हवा आणि पर्यावरण, नैसर्गीक आपत्तींपासून संरक्षण, दहशतवादापासून आणि एकूणच भयापासून मुक्ती, त्यांचे एकूण जीवनमान उंचावणे म्हणजे मानवी सुरक्षा. शस्त्रांची संख्या किंवा दर्जा वाढवण्याने यापैकी काहीच साध्य होणार नाही.
बाजारात भरपूर माल असणे म्हणजे मानवी सुरक्षा नव्हे. जनतेकडे तो विकत घेण्याची क्षमता हवी. नागरिकांना सक्षम बनवणे , त्यांचा सन्मान राखणे म्हणजे मानवी सुरक्षा. जागतिकीकरणामुळे नागरिकांचे जिणे मुश्किल झाले आहे. १९९७ च्या आशियातील आर्थिक संकटामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली.
आर्थिक सुरक्षा, अन्न सुरक्षा, आरोग्य सुरक्षा, पर्यावरण सुरक्षा, वैयक्तिक सुरक्षा, समुहाची सुरक्षा, राजकीय सुरक्षा ही मानवी सुरक्षेची विविध अंगे आहेत.
PLEASE FOLLOW ME
Explanation: