Social Sciences, asked by yyogi5928, 11 months ago

मानवी समाज दीर्घकाळ वस्ती कोठे करतो?

Answers

Answered by somyasingh19
6

Answer:

china

Explanation:

china is the answer

Answered by rajraaz85
0

मानव हा समाजशील प्राणी आहे मानवाला जगण्यासाठी काही आवश्यक अशा गोष्टींची गरज असते म्हणूनच अतिशय सुरुवातीच्या काळापासून मानव हा ज्या ज्या ठिकाणी त्याला जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींची पूर्तता होत असेल अशा ठिकाणी तो वस्ती करून राहू लागला.

सुरुवातीच्या काळापासून पाहिले तर असे लक्षात येते की ज्या ठिकाणी पाण्याचे मुबलक प्रमाणात उपलब्धता आहे आणि पाण्याचा उपयोग शेतीसाठी केला जाऊ शकतो अशा प्रदेशातच मानव दीर्घकाळ वस्ती करून राहत असे.

पाणी हा जीवन जगण्यासाठी अतिशय आवश्यक घटक असल्यामुळे पिण्यासाठी, प्राण्यांसाठी व शेतीसाठी त्याची आवश्यकता असते म्हणूनच नदी तळे किंवा पाण्याचा कुठलाही माध्यम उपलब्ध आहे अशा ठिकाणी मानव दीर्घकाळ वस्ती करून राहत असे.

आधुनिक काळात देखील जीवनावश्यक गोष्टींची पूर्तता ज्या क्षेत्रामधून होत असते त्या ठिकाणी मनुष्यवस्ती दीर्घकाळ टिकलेली पहावयास मिळते. जीवनावश्यक घटकांबरोबरच मानवाच्या प्रगतीसाठी आवश्यक असणारे घटक ज्या ठिकाणी सहजपणे उपलब्ध होतात अशा ठिकाणी मानव दीर्घकाळ वस्ती करून राहतो.

#SPJ3

Similar questions