CBSE BOARD X, asked by kashrawool19, 9 months ago

मानवी समज निबंध हवा आहे​

Answers

Answered by saritabhatt780
0

Answer:

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो मानवी जीवनात विनोदाचे स्थान महत्त्वाचे आहे. असे म्हणता येईल की माणूस विनोदा शिवाय अपूर्ण आहे. आज आपण Manvi Jivanat Vinodache Mahatva याविषयी निबंध बघणार आहोत. आणि मानवी जीवनातील विनोदाचे श्रेष्ठता तुम्हाला लक्षात येईल चला तर मग निबंधाला सुरुवात करुया.

निबंध लिहीत असताना लक्षात ठेवायचे महत्त्वाचे मुद्दे:-

मानवी जीवनात सुख दुःख चालूच राहतात

विरंगुळा याची गरज

दुःख, निराशा यातून बाहेर पडण्याचा सुसंस्कृत व मार्ग विनोदनिर्मिती,

विनोदाचे कार्य म्हणजे जगण्यातला आनंद मिळवून देणे,

हास्य हा माणसाला लाभलेला दुर्मिळ अलंकार,

विनोदाच्या माध्यमातून समाज प्रबोधन शक्य,

विनोद कोठे कोठे आढळतो ?

रोजच्या जीवनात साहित्यात, व्यंगचित्रात

सर्व प्रकारचे उच्च विरोध विसंगती कडून सुसंगती कडेने नेतो

विनोद अभावी मानवी जीवन शुष्कनिरस

म्हणून विनोद हवाच

विनोदाची काही उदाहरणे निबंधाचे योग्य पद्धतीने यावीत

' हास्य' ही माणसाची सहज प्रवृत्ती आहे. माणसाला आपल्या दुःखाचा निचरा करण्यासाठी हास्य हा रामबाण उपाय सापडला आहे. म्हणूनच माणूस म्हणजे असणारा प्राणी ही माणसाची व्याख्या योग्य ठरते. हे हे हास्यविनोद यामुळे निर्माण होते. म्हणून तर मानवी जीवनात विनोदाला महत्त्व अनन्यसाधारण आहे.

सर्कशीत जे प्रयोजन विदूषकाचे तेच मानवी जीवनात विनोदाचे ! मानवी जीवन म्हणजे सुद्धा एक तारेवरची कसरत असते. ' सुख पाहता जीवा पडे। दुःख पर्वताएवढे।। संत तुकारामांनी मानवी जीवनात वर्णन केले आहे. या पर्वताएवढे दुःखा खाली चिरडून जाताना विनोदाचा आधार आवश्यक ठरतो. विनोदाने क्षणभर का होईना, पण दुःखाचा विसर पडतो. पण हा क्षणच माणसाचा हुरूप वाढून त्याचे आयुष्य सुसह्य करतो.रामदास स्वामींनी ' टवाळा आवडे विनोद' असे लिहिले आहे. पण मला वाटते खुशी शब्दात त्यांनी मूर्खाची लक्षणे सांगणाऱ्या रामदासांना विनोदाचे वावडे असेल असे वाटत नाही. मानवी जीवनात अनेक तऱ्हेच्या विसंगती हे विनोदाचे उगमस्थान आहे. गुलाबाचे फुल आवडणारा माणूस जसा वेगळा, तसेच विनोद आवडणारा माणूसही वेगळाच असतो, माणसाला अगदी लहानपणापासून विनोदाचा परिचय असतो. लहान मुलांना सगळे प्राणी आवडतात; त्यांना माकड जास्त प्रिय असते, ते त्याच्या माकडचेष्टा मुळेच!

जीवनाकडे खेडकर दृष्टीने बघायला शिकवणारे साहित्यिक, नट, वक्ते, व्यंगचित्रकार लोकांना नेहमी हवेसेच वाटतात. लोकांची आयुष्य सुखकर करण्यात त्यांचा फार मोठा वाटा असतो. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राम गणेश गडकरी, हे आजच्या पिढीला परिचित वाटत. प्र के अत्रे म्हणजे विनोद सम्राट! असे म्हणतात की, सभास्थानी अत्रे आले एवढी कुणी म्हटले तरीच सारे सभागृह खदखदून असे. पु ल देशपांडे आणि तर आपल्या विनोदी साहित्यांनी वाचकांच्या मनात हत्याचे मळे फुलवले आहेत. लोक आपल्या आयुष्यातील दुखाचा विसर पडावा म्हणून पुलंचे साहित्य वाचतात. शिवाय फुलाच्या विनोदी साहित्याला कारुण्याची झालर असते. त्यामुळे वाचकही अंतर्मुख होतो आत्मपरीक्षण करण्यास प्रवृत्त होतो.

तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये विनोदाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि आजच्या घडीला तर फेसबुक व्हाट्सअप यासारख्या समाज माध्यमाद्वारे आपण विनोदाचा आणि गमतीचा प्रत्येक क्षणाला आनंद घेतो आणि उत्साही राहतो काळ बदलत गेला परिस्थिती बदलत गेली परंतु विनोदाचे महत्व मानवी जीवनाचा आधार आहे. प्रेरणेचा कण आहे. तसेच वरील निबंधामध्ये मला सांगायची आहे. मानवी जीवनात विनोदाचे महत्व Manvi Jivanat Vinodache Mahatva हा निबंध कसा वाटला आहे कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला जर काही आणखीन मुद्दे सांगायचे असतील काही विचार सुचवायचे असतील किंवा कुठल्या विषयावर निबंध हवा असेल तर याबद्दल नक्की कमेंट करा तुम्हाला तरी त्याचा रिप्लाय मिळेल आणि तुम्ही केलेल्या सूचनांचे पालन केले जाईल

Similar questions