मानवी शरीरातील रासायनिक नियंत्रण कसे होते हे सांगून काही संप्रेरकांची नावे व त्यांचे कार्य विशद करा.
Answers
संप्रेरकाची नावे व कार्ये
●थायमोसीन
थायमोसीन कार्य - प्रतिकार शक्ती निर्माण करणाऱ्या पेशींवर नियंत्रण ठेवणे.
●थायरॉक्झिन
थायरॉक्झिन कार्य - श्रीरावही वाढ व चयापचय क्रिया नियंत्रित करणे.
धन्यवाद...
मानवी शरीर खूप गुंतागुंतीचे आहे, आपल्या शरीरात ग्रंथीमार्फत काही रासायनिक पदार्थ तयार होतात, ज्यांना आपण संप्रेरके म्हणतो.
या स्रावांचे वहन होण्यासाठी कोणत्याही वाहिन्या नसतात, हि संप्रेरके सरळ रक्तात विरघळतात.
संप्रेरकांद्वारे शरीरातील काही महत्वाच्या क्रियांचे नियंत्रण व एकात्मीकरण केले जाते.
गरज असेल तितक्या प्रमाणातच शरीरात संप्रेरकांचे स्रवण होणे आवश्यक असते त्याचे नियमन या ग्रंथीद्वारे केले जाते.
संप्रेरकांची नावे आणि त्यांची कार्ये पुढील प्रमाणे
१) इन्सुलिन : रक्तातील साखरेचे नियमन करते.
२) इस्ट्रोजेन : महिलांच्या गर्भाशयाच्या अंतस्रावांची वाढ करते.
३) प्रोजेस्टेरॉन : गर्भधारणेस मदत करते.
४)टेस्टेस्टेरॉन : पुरुषांच्या दुय्यम लक्षणांचा विकास करते.
५) थायमोसिन : प्रतिकारशक्ती निर्माण करणाऱ्या पेशींवर नियंत्रण करते.
६) थायरॉक्सिन : शरीराची वाढ आणि चयापचयाची क्रिया नियंत्रित करते.
७)वृद्धी संप्रेरक: हांडांच्या वाढीला चालना देते.
८) प्रोलॅक्टिन : मातेस दुग्धउत्पादनेस मदत करते.
९) पुटिका ग्रंथी संप्रेरक : जनन ग्रंथींची वाढ नियंत्रित करते.
१०) प्रतिमुत्रल संप्रेरक : शरीरातील पाण्याच्या प्रमाणाचे नियंत्रण करते.