मानव वस्ती कशी निर्माण झाली असेल
Answers
Answer:
पारिस्थितिकी शास्त्राप्रमाणे ‘वस्ती’ ही सजीवांच्या निवासस्थळाचा बोध करून देणारी संज्ञा आहे. ती असे दर्शविते की, त्या ठिकाणी त्या विशिष्ट सजीवाला आवश्यक असणारे पर्यावरणीय घटक उपलब्ध आहेत व तो सजीव तेथे कायम अथवा तात्पुरता निवासी आहे. त्यामुळे ‘पृथ्वी ही सजीवांची वस्ती आहे’ हा संबोध त्या दृष्टीने अर्थपूर्ण ठरतो. विशिष्ट सजीवास विशिष्ट पर्यावरणीय घटकांची आवश्यकता असते. काही प्रमाणात उपलब्ध नैसर्गिक घटकांत सजीव आवश्यक ते फेरफार घडवून आणतो व ‘वस्ती’ निर्माण करतो. वस्तीमध्ये त्या सजीवाने नैसर्गिक घटकांत फेरफार करून उपकारक असे घटक निर्माण केलेले आढळतात. ‘वाघांची वस्ती’ असा शब्दप्रयोग केल्यास वाघांना जगण्यास आवश्यक घटक व वाघांचे तेथील वास्तव्य यांचा बोध होतो. सजीवाच्या स्वरूपाप्रमाणे ‘वस्ती’ ही संज्ञा व्यापक प्रदेश किंवा विशिष्ट छोटी जागा किंवा एखादा प्राणी दर्शविते. उदा., गोचिडीचा विचार करता बैल, गाय इ. प्राण्यांचे शरीर ही तिची ‘वस्ती’ असू शकते.
मनुष्यप्राण्याच्या संदर्भात ‘वस्ती’ हा शब्द मनुष्याच्या निवास प्रदेशाचा बोध करून देतो. ‘मनुष्यवस्ती’ ही संकल्पना अत्यंत व्यापक व अर्थगर्भ आहे. कारण येथे आपणास मनुष्य किंवा माणूस (मॅन किंवा मॅनकाइंड) व मानव (ह्यूमन बीइंग-ह्यूमनकाइंड)या शब्दांचे भिन्न अर्थ लक्षात घ्यावे लागतात. मनुष्य किंवा माणूस हे शब्द सामान्यतः ‘मनुष्य हा एक प्राणी (ॲनिमल) आहे’ या अर्थाने विचारात घेतले जातात. मनुष्यप्राणी हा जीव आहे (ऑर्गनिझम), त्यामुळे त्याच्या अस्तित्वासाठी सूर्यप्रकाश, हवा, पाणी, अन्नादी घटक आवश्यक असतात. वस्तीचा विचार करताना या घटकांची उपलब्धता विचारात घ्यावी लागते. तसेच मनुष्यप्राणी हा एकाकी नाही त्याचा इतर जीवांशी साखळी संबंध आहे. विशेषतः अन्नासाठी तो अन्य सजीवांवर, वनस्पतींवर आणि प्राण्यांवर अवलंबून असतो. त्याची अन्नासाठी इतर प्राण्यांशी होणारी स्पर्धा व सहकार्य, अन्न साखळीत उद्भवणारे खंड यांचा मनुष्यवस्तीशी संबंध असतो.
मनुष्यप्राणी हा समूहशील प्राणी आहे. त्यामुळे तो समूहाच्या स्वरूपात वस्ती करणार हेसुद्धा ओघानेच येते. मनुष्यवस्तीचे प्राकृतिक घटक वैयक्तिक व सामूहिक पातळ्यांवर पाहणे व अंती जागतिक पातळीवर ‘पृथ्वी’ हे मानवाचे घर आहे या दृष्टीने वस्तीबाबतचे विचार मांडणे, हे मनुष्यवस्तीच्या दृष्टीने संयुक्तिक आहे.
Answer:
mai hu bangtan army I love. jimin aaur tum