India Languages, asked by bharatmahesh0305, 9 months ago

मी पाहिले एक जत्रा essay in मराठी

Answers

Answered by pathakshreya456
16

Answer:

माझ्या मामाच्या गावात एक मोठे शंकराचे देऊळ आहे.महाशिवरात्रीला तिथे मोठा उत्सव असतो. तेव्हा तिथे खूप मोठी जत्रा भरते.आसपासच्या गावांमधून खूप लोक देवाच्या दर्शनासाठी आणि जत्रा पाहायला तिथे येतात.मी दर वर्षी या जत्रेत जाते.

जत्रेत माणसांची खूप गर्दी असते.देऊळ सजवलेले असते. रंगीबेरंगी पताके लावून सजावट केली जाते.फुलांच्या माळा लावल्या जातात.दिव्यांची रोषणाई केली जाते.

जत्रेत अनेक दुकाने मांडली जातात.तिथे तऱ्हेतऱ्हेच्या वस्तू विकायला असतात.खेळणी, भांडी,कपडे,पूजेचे सामान,मिठाई,विवध कानातले व गळ्यातले हार अशा वेगवेगळ्या वस्तू विकायला असतात.

तिथे वेगवेगळे पाळणे असतात.पाळण्यात बसायला लोकांची गर्दी जमली असते.एके ठिकाणी जादूचे खेळ चालू असते.यावर्षी तर लोकांची करमणूक करण्यासाठी एके ठिकाणी 'भूत बंगला' बनवला गेला होता.त्यात आम्ही गेलो होतो,तेव्हा खूप घाबरलो, पण तितकीच मजासुद्धा आली.

संपूर्ण जत्रेमध्ये उल्लासाचे व आनंदाचे वातावरण असते.मला इथे खूप मजा येते म्हणून मी दरवर्षी या जत्रेत येते.

Similar questions