World Languages, asked by Anonymous, 1 year ago

मी पाहिलेला किल्ला मराठी निबंध

Answers

Answered by amitkumar9266
6

Answer:

please mark me as the brainest answer and follow me

Attachments:
Answered by tanvibhojane20
1

Answer:

मी पाहिलेला किल्ला म्हणजे रायगड किल्ला हा मी शाळेमध्ये असताना एका सहली द्वारे पाहिला होता. आम्ही पुण्यावरून एसटी बस ने रायगड किल्ला गाठला. हा किल्ला म्हणजे निसर्गरम्य आणि डोंगराळ परिसर आहे.

रायगड किल्ल्याच्या चारही बाजूने पर्वते आहेत. किल्ल्याच्या जवळपास काही गावे सुद्धा बसलेली आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या किल्ल्याचा आसपासचा परिसर बघण्यासारखा  होता. सगळीकडे हिरवळ होती.

हिरव्या घनदाट झाडांमुळे आम्ही जंगलामध्ये आल्यासारखे वाटले. मला छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व खूप आवडते. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन काळातील महत्त्वपूर्ण भाग असणारा हा किल्ला पाहण्यासाठी मी अधिकच आतुर होतो.

जेव्हा मी रायगड किल्ल्यावर पोहोचलो तेव्हा माझ्या आनंदाची सीमा राहिली नाही‌. नजरेसमोर कळ्या दगडाने एक भव्य पण थोडी तुटलेली इमारत उभी दिसली.

महाराष्ट्र शासनाने काही वर्षापूर्वी रायगड किल्ल्याची दुरुस्ती केलेली होती त्यामुळे रायगड किल्ल्याचे दृश्य अद्यापही इतिहासाप्रमाणे चांगलेच आहे. एवढेच नसून गडांची देखरेख करण्यासाठी गडावर कायमस्वरूपी चे एक कार्यालय  होते.

आम्ही ज्यावेळी रायगड किल्ल्यावर गेलो होतो त्यावेळी तेथे अनेक परदेशी पर्यटक सुद्धा किल्ला पाहण्यासाठी आले होते. रायगड किल्ल्याचा गेटमधून मी आत गेलो गडामध्ये शिरताच समोर मला एक मोठा हाॅल दिसला. आमच्या मार्गदर्शकाने सांगितले की, इतिहासात हा हॉल शिवाजी महाराजांचे दरबार असायचे.

हॉल जवळ येत शेजारी तोफांचे घर होते यामध्ये विविध तोफा ठेवलेला होता. तसेच हॉलच्या आजूबाजूला मोठमोठ्या खोल्या सुद्धा होत्या. असे म्हटले जाते की, शिवाजी महाराजांच्या दरबारात काम करणारे सर्व मंत्री वगैरे या खोल्यांमध्ये राहत होते.

हाॅल बघून झाल्यानंतर पुढे पुढे चालत गेल्यानंतर  तेथे गवताचे मैदान दिसले.  शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मैदानामध्ये एक मोठी बाग होती असे समजले जाते. तेथे जवळ विविध खोल्या होत्या‌. या खोल्या शिवाजी महाराजांच्या महलाचा भाग समजला जातात.

रायगड किल्ल्याचे जुन्या दगडाने केलेले बांधकाम हे प्राचीन भव्य त्याचे दर्शन घडते. रायगड किल्ल्याचे दृश्य पाहून मला मी शिवाजी महाराजांच्या काळात पोहोचल्या सारखेच वाटले.

संपूर्ण रायगड किल्ला पाहायला मला दोन ते तीन तासाचा वेळ लागला.

रायगड किल्ला बऱ्याच उंचीवर स्थिर असा किल्ला आजही आपल्याला पाहायला मिळतो. रायगड किल्ल्याचे आजही ऐतिहासिक  स्थळ म्हणून जतन आणि संवर्धन केले जाते. जरी काळाच्या ओघात रायगड किल्ल्याचा बाराचा भाग कोसळला असला तरी रायगड किल्ला आज ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा साक्ष म्हणून उभा आहे.

असा हा मी पाहिलेला किल्ला म्हणजेच रायगड किल्ला निसर्गरम्य, पर्यटकांसाठी प्रसिद्ध ठिकाण आणि ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वाचा किल्ला समजला जातो.

Similar questions