मी पाहिलेला क्रिकेट चा सामना या विषयावर एक मनसोक्त निबंध
Answers
जिंकण्यासाठी १ बॉल,४ रन आणि विकेट ही शेवटची, आणि समोर वेगवान गोलंदाज. गोलंदाजाने वेगाने चेंडू टाकला आणि त्याच वेगाने फलंदाजानी उत्कृष्ट षटकार मारला!
आणि भारताचा विजय झाला!!
संपूर्ण स्टेडियम विजयाचा जल्लोष करत होते, हे बघून डोळ्यांचे पारणे फिटले. अश्या मी अनेक मॅचेस स्टेडियम मधून बघितल्या आहेत पण आजचा हा सामना अतिशय रोमांचक होता. भारतीय खेळाडूंची फलंदाजी व गोलंदाजी खूपच मस्त होती. अशी ही माझी आवडती मॅच होती!
Answer:
१९९९ मध्ये विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सामने चालले होते. या स्पर्धेत दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलिया या संघांत उपांत्य सामना होणार होता. हा मी पाहिलेला अत्यंत चुरशीचा सामना होता.
सामन्याचा दिवस उजाडला. मी खादयपेये घेऊन स्टेडियमवर गेलो. ठीक वेळेवर दोन पंच आणि दोन्ही संघांचे कप्तान मैदानावर आले. नाणेफेक झाली. त्यात दक्षिण आफ्रिकेच्या कप्तानाने-हॅन्सी क्रॉनिएने बाजी मारली. मैदानाचा रागरंग पाहून त्याने प्रथम गोलंदाजी स्वीकारली.
थोड्याच वेळात ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर अॅडम गिलख्रिस्ट आणि मार्क वॉ फलंदाजीसाठी मैदानात उतरले, तर दक्षिण आफ्रिकेचा संघ क्षेत्ररक्षणासाठी मैदानात आला. कप्तानाने चेंडू शॉन पोलॉक याच्या हातात दिला. आता साऱ्या प्रेक्षकांनी आपले श्वास रोखून धरले होते. जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने आपल्या खेळाची सुरुवात मोठ्या सावधपणे केली. खेळ थोडा धीमा वाटत होता. प्रेक्षक धावांच्या आतषबाजीसाठी आतुर झाले होते; पण फलंदाज फारच सावधपणाने खेळत होते.
नियोजित पन्नास षटकांमध्ये ऑस्ट्रेलियाने आपल्या नावावर २१३ धावा झळकावल्या. चाळीस मिनिटांची विश्रांती सुरू झाली. क्रीडांगणावर खेळाडू नव्हते, प्रेक्षक जरा सैलावले होते. बरोबर आणलेल्या खाद्यवस्तूंचा समाचार घेणे सुरू झाले.
थोड्याच वेळात दक्षिण आफ्रिकेचे सलामीवीर मैदानावर फलंदाजीसाठी उतरले.
ऑस्ट्रेलियाचा संघही क्षेत्ररक्षणासाठी मैदानात आला. दक्षिण आफ्रिकेला सामना जिंकण्यासाठी २१४ धावा करायच्या होत्या. सुरुवात चांगली झाली. धावफलकावर दक्षिण आफ्रिकेच्या नावावर बिनबाद ४६ धावा लागल्या. जॉन्टी होडस् व लान्स क्लुसनर यांनी वेगाने फलंदाजी केली. धावफलकावर ७ गडी बाद २०० धावा झाल्याच्या अंकपट्ट्या लावण्यात आल्या. आता फक्त १४ धावा करायच्या होत्या. बहुतेक हेच दोन्ही खेळाडू सामना जिंकून देतील, असे वाटत असतानाच जॉन्टी बाद झाला. सारे प्रेक्षक हळहळले. जमलेली जोडी फुटली होती. नंतर मर आलेला शॉन पोलॉक शून्यावर बाद झाला. आता चुटपूट लागली, दक्षिण आफ्रिका सामना गमावणार की काय? पण अखेरच्या षटकात क्लुसनरने तीन चौकार मारले. आता फक्त दोनच धावा हव्या होत्या; पण शेवटचा फक्त एकच गडी बाकी होता. कशीबशी एक धाव मिळाली !
आता एक धाव काढली की विजय दक्षिण आफ्रिकेचा होणार, हे जवळ जवळ निश्चितच होते. सारे प्रेक्षक नि:स्तब्ध होते आणि दुर्दैव म्हणजे, डोनॉल्ड धावचीत झाला. दोन्ही संघांची धावसंख्या सारखीच झाली, २१३ ! मॅच 'टाय' झाली होती. मग विजय कोणाचा? सारे वातावरण संभ्रमित होते. पंच निर्णय काय देणार? सर्व अधिकाऱ्यांच्या विचारविनिमयानंतर निर्णय जाहीर झाला. साखळी सामन्यांत पहिल्या फेरीत ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेवर मात केलेली असल्यामुळे 'ऑस्ट्रेलिया'चा संघ विजयी ठरला. दक्षिण आफ्रिकेचा संघ या रोमहर्षक सामन्यात पराभूत झाला होता. 'क्रिकेट इज ए गेम ऑफ चान्स' म्हणतात ते यासाठीच! आजवर मी अनेक सामने पाहिले; पण अखेरच्या क्षणापर्यंत उत्सुकता टिकवून धरणारा असा रंगतदार सामना मी यापूर्वी कधीच पाहिला नव्हता.