मी पाहिलेला महापुर निबंध
Answers
Answer: आयुष्यात मी पाहिलेला पहिला महापूर म्हणजे २६ जुलै, २००५ मध्ये अतिवृष्टीमुळे मुंबईत आलेला महापूर.
२००५ साली मी इयत्ता सहावीत शिकत होते. त्या दिवशी मी आणि माझा भाऊ शाळेत गेलो होतो. पावसाचेच दिवस असल्याने फारशी चिंता न करता लोक आपापल्या कामाला निघून गेले होते. दुपारनंतर पाऊस वाढला. लोकल ट्रेन्स बंद पडल्या. शाळेतून पालक मुलांना लवकर घेऊन येऊ लागले. काही शिक्षक आणि मुले शाळेतच अडकून पडले. घराघरांत पाणी शिरले होते. हजारो संसार पाण्यात बुडाले. अनेक लोक, जनावरे मृत्युमुखी पडले. अन्नधान्याची नासाडी झाली. रोगराईने थैमान घातले होते.
असा हा महापूर आठवला की आजही अंगावर काटा उभा राहतो.
Explanation:
२६ जुलै २००५ साली मुंबईला पुराचा तडाखा बसला. मी आणि माझी बहिण नेहमीप्रमाणे सकाळी शाळेत गेलो. आई बाबाही सकाळी आपापल्या ऑफिसला गेले. मुंबई साठी पाउस काही नवीन नाही. त्यामुळे सकाळपासून पाउस सुरु असला तरीही सगळेजण आपापल्या कामाला लागले होते.
अचानक दुपारपासून पावसाचा जोर वाढला. सगळीकडे पाणी साचू लागलं.आम्ही शाळेतून घरी पोहोचेपर्यंत आमच्या इमारतीच्या तळ मजल्यावर गुडघाभर पाणी साचलं होतं. कशीबशी त्या पाण्यातून वाट काढत आम्ही दोघी घरापर्यंत पोहोचलो. आमचं घर तळमजल्यावर असल्यामुळे घरातही पाणी शिरलं होतं. आम्ही दोघी घाबरून गेलो. पाण्याची पातळी हळू हळू वाढत होती. काय करावं ते आम्हाला कळेना. शेजारीही तीच परिस्थिती होती. आम्ही आई बाबा घरी कधी येतील ह्याची वाट पहात बसलो.
तिकडे आई बाबाही पावसामुळे ट्रेन बंद असल्यामुळे अडकून पडले होते. शेवटी तेही इतर लोकांसारखे रेल्वे रूळावरून कसेबसे पाण्यातून वाट काढत घरी पोहोचले. त्यांना घरी आलेले बघितल्यावर आमच्या जीवात जीव आला.
संपूर्ण मुंबईभर अतिवृष्टीमुळे हीच परिस्थिती होती. ह्या महापुरामुळे अतोनात नुकसान तर झालेच पण नंतर रोगराईही पसरली.
असा हा महापूर आम्ही आमच्या आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही.