मी पाहिलेले निसर्ग सुंदर सा निबंध in मराठी
please send me
Answers
Answer:
मी पाहिलेले निसर्ग
Explanation:
आमच्या घरात प्रवासाची आवड सर्वांनाच आहे. त्यातल्या त्यात निसर्गरम्य ठिकाण पाणी हे अधिकच आवडते. मी आणि ठिकाणाचा प्रवास केला परंतु त्यातील बनाने सागर मराठी गाणं खूप आवडले.
निसर्ग हा माणसाचा मित्र आहे. आणि या निसर्ग मुळेच आपण सर्वास सुखद असे जीवन जगत आहोत.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पावसाळ्याचे दिवस चालू होते संपूर्ण सृष्टी निसर्गरम्य आणि सुखात दिसत होती. झाडे, डोंगर, दर्या यांनी जणू हिरव्या रंगाचे शाल पांघरली होती.
हळूहळू ढगांचे पडद्याआडून सुर्यनारायण वर येत होता. हे दृश्य जणु हिरव्या साडीला केशरी रंगाची छानसी किनार असल्याप्रमाणे दिसत होते. या सुंदर निसर्गाचे वर्णन करण्यासाठी शब्द पुरणार नाही.हे निसर्गाचे सुंदर दर्शन बघून आई-बाबांनी दोन ते तीन दिवस वर्षा सहलीला जाण्याचे ठरविले. त्यासाठी सर्वजण कुठल्या ठिकाणी फिरायला जायचे याच्यावर विचार करत असताना बाबा म्हणाले, कोकणातील गुहागर जवळील देवराई पहायची आणि थोडेसे समुद्रकिनारा भटकायचा. बाबांचा विचारायला आणि मला खूप आवडला.
एका अतिशय निसर्गरम्य ठिकाण आम्ही पहायला जाणार होतो या विचाराने मी अधिकच आनंदित होतो. कोकणासाठी जाण्याचा आमचा प्रवास नक्की झाला. काही कोकण प्रवास रेल्वेने तर काही बसने तर काही पायी चालून जायचा होता. कोकणातील निसर्गरम्य दिशेने आमचा प्रवास सुरू झाला.
श्रावण महिना सरत होता आणि निसर्ग अधिकच खुलून येत होता अशा परिस्थितीमध्ये कोकणाचा निसर्ग पाहण्याचा आनंद हा वेगळाच होता. आकाशात ढगांचा विरळ पडदा निर्माण झाला. आणि बघता बघता पावसाच्या अवखळ सरी धरतीवर कोसळू लागल्या. कोकणाचा सुंदर निसर्ग आणि त्यात श्रावणातील सरी हे दृष्य अद्भुत होते.
अशा या निसर्गरम्य पावसाचा आनंद घेत आम्ही चिपळूण गुहागर ला कधी पोहोचले कळालेच नाही. त्या दिवशीदेवराई हिरवीगार आणि झाडांनी गच्च भरलेली आहेत. प्रत्येक झाडाची उंची हे सामान आणि त्याच्या वृक्ष संभारा मुळे सूर्यप्रकाश थोपवून धरला होता. झाडांची सावली जमिनीवर जशी जाई कोरल्या सारखी दिसते.
देवराईत फक्त झाडेच नसून फणस, आंबा, पपई, साग, पिंपळ, वड, अशा विविध प्रकारची झाडे पाहायला मिळतात. काही वडाच्या झाडाला तर पारंब्या जमिनीत घुसून त्यापासून नवीन रुक्ष तयार झालेली आहेत. तर खूप अशा प्रकारच्या झाडांवर अनेक प्रकारच्या वेली वेटाळा घातलेल्या दिसते. ही देवराई कमीत कमी शंभर वर्षापेक्षा अधिक काळ जुनी असेल.
देवराईचे सुंदर निसर्गरम्य दर्शन झाल्यानंतर पुन्हा घराकडे येताना मन जडावले. शब्द जणू मुके झाले आणि पावले जागेला थांबली. निसर्गाच्या सहवासात ऊन मानवी मनावर जणू प्रदूषणाचा राज्यावर असाच माझा हाल झालेलं होतं.
चा मुक्काम आम्ही चिपळून येथेच केला. दुसऱ्या दिवशी आई-बाबा आणि मी देवराई पाहण्यासाठी निघालो. गप्पा मारत आजूबाजूचा निसर्ग पाहत आम्ही वाटाड्याच्या मागे मागे चालत होतो. ते दृश्य पाहताच माझ्या तोंडातून बापरे! असा शब्द निघाला. किती झाडे ते माझ्या जीवनामध्ये एकत्रित एवढे झाडे मी कधीही पाहिली नव्हती. ते दृश्य बघून मी जागच्या जागी डोळे विस्फारून पाहात होते.
खरं तर हा देवराई चा दृश्य मनाला मोहीत करणारा होता. हे दृश्य पाहून मी निसर्गाच्या अधिकच प्रेमात पडलो.
आज पर्यंत मी पाहिलेला निसर्ग ठिकाणांपैकी कोकणातील हा प्रवास अधिकच निसर्गरम्य आणि मनाला शांत करणारा ठरला.