मी पाहिलेला सूर्यास्त Marathi essay
Answers
■■"मी पाहिलेला सूर्यास्त"■■
गावी आमच्या घरासमोर एक छान अंगण आहे.अंगणातून दूरचे क्षितिज दिसते.तिथून दररोज सूर्यास्ताचा मोहक दृश्य दिसतो.त्यादिवशी सूर्यास्त काही वेगळेच होते.
संध्याकाळी ऊन हळूहळू कमी होऊ लागले.सूर्य क्षितिजाकडे सरकला. सूर्याचा रंग हळूहळू बदलू लागला.तो नारंगी रंगाचा दिसू लागला.
सूर्य जेव्हा क्षितिजाकडे टेकला,तेव्हाचे दृश्य खूपच सुंदर होते.सूर्य तिथेच रहावे,असे मला वाटत होते.या दृश्याच्या सौंदर्येत सौम्य पावसाने भर घातला.
आकाशात ढग दिसू लागले.सूर्यास्ताच्या वेळी हे ढग रंगीबेरंगी दिसू लागले.आकाश जणू काही रंगांनी भरून गेले होते.वातावरण अगदी प्रसन्न झाले होते.
सूर्यास्ताचा हा देखावा कधी संपू नये, असे मला वाटत होते.
Answer:
निसर्ग म्हणजे सौंदर्याचा मूर्तिमंत उदाहरण आहे .यामध्ये किती सुंदर सुंदर गोष्टी आहेत. आमचे घर नदीच्या किनाऱ्यावर आहे त्यामुळे नदीच्या काठावर बसून नदीच्या पाण्यात पाय टाकून बसणे हा माझा आवडीचा छंद आहे . बऱ्याच वेळा पाण्यामध्ये खेळणाऱ्या माशांकडे बघत बसणं माझा विरंगुळा आहे..
संध्याकाळी शाळा सुटली की मी पळत घरी येत असे. अंगणात बसून आकाशात उडणाऱ्या पक्षांची गंमत बघत असे. एका रांगेत जाणारे पक्षी बघून मनाला फार आनंद होतो. त्या पक्षांना बघून मलाही कधीकधी पक्षी व्हावेसे वाटते आणि उंच आकाशात भरारी घेऊन संपूर्ण जग पहावे अशी इच्छा माझ्या मनात येते.
रविवारचा दिवस होता आणि मी माझे आवडीचे काम म्हणजे नदीच्या पाण्यात पाय टाकून बसणे आणि माशांची गंमत बघणे यात मग्न होतो..
नदीच्या एका काठावर बसून मी गंमत बघत होतो हळूहळू पाण्यामध्ये लाल पिवळसर रंग पसरू लागला. नदीच्या दुसऱ्या काठावर असलेल्या झाडांच्या खालून सूर्याची किरणे पाण्यात चमकू लागली होती आणि तो प्रकाश थेट माझ्या तोंडावर येत होता.
हे मनोभावक दृश्य बघून माझ्या मनात वेगळीच ऊर्जा निर्माण झाली . इतके दिवस खाली मान घालून पाण्यात पाय हलवण्यात इतका मग्न होतो की, मान वर करून सूर्यास्ताचे हे सुंदर दृश्य बघण्याला मी विसरूनच गेलो होतो.
आकाशात सगळीकडे पिवळसर गुलाबी रंग पसरलेला होता. उन्हाची तीव्रता खूपच कमी होती. पक्षी आपापल्या घराकडे रांगेत निघाले होते. जणू शाळेतील कवायतीचा शारीरिक शिक्षणाचा तासच सुरू होता त्यांचा. मला तर वाटलं हे सगळे बगळे पोलीस भरतीच्या परीक्षेसाठी पळण्याचा सराव करत आहेत की काय .
डोंगराच्या आडून सूर्यबिंब दिसत होते. लाजून एखाद्या सुंदर स्त्रीने आपले दोन्ही हात तोंडावर झाकून घ्यावेत .तसेच दोन डोंगरांच्या मागे सूर्य जणू लपत होता. सूर्यबिंब भोवती सोन्याच्या बांगडी सारखी बारीक कडा दिसत होती .सूर्य साज करून बसला असल्याचे वाटत होते..
पाण्यात पाय बुडवले असल्यामुळे पाण्यातील छोटे मासे पायांना गुदगुल्या करत होते .त्यामुळे भानावर आलो ,आणि वाटले इतके सुंदर मनोहारी दृश्य कैद करून घ्यावे .या विचाराने घरात मोबाईल आणण्यासाठी गेलो. वडील कोणाशी तरी फोनवर बोलण्यात गुंग होते .वडिलांचे बोलणे संपण्याची वाट बघत मी तिथे थांबलो .त्यांच्या तोंडाकडे एकटक बघत होतो मी .माझी ही कसरत बघून वडिलांनी फोन चालू असतानाच नजरेने मला काय हवे असे विचारले. मीही त्यांना हातवारे करूनच फोटो काढण्यासाठी मोबाईल पाहिजे असे सांगितले व त्यांचा हात धरून त्यांना माझ्याबरोबर घेऊन गेलो.
वडील फोनवर बोलतच माझ्याबरोबर आले आम्ही योग्य त्या ठिकाणी येऊन पोहोचलो मी वडिलांना समोर दिसणारा सूर्यास्त दाखवला माझ्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि आनंद बघून त्यांना फारच बरे वाटले तेव्हा मी खुणेनेच फोन वर बोलणे बंद करून फोटो काढण्यासाठी त्यांना सांगितले.
वडिलांनीही लगेच माझे म्हणणे मान्य करून फोनवरचे संभाषण थांबवले. आम्ही भरपूर फोटो काढले. वडिलांनी मला एखादी वस्तू हातात धरल्यासारखे एक हात वर करून उभे राहण्यास सांगितले आणि दुरून माझा फोटो काढला .मला सुरुवातीला काही कळत नव्हते पण जेव्हा मी फोटो बघितला तेव्हा ते सूर्याचे बिंब मी हातात धरले आहे असे दिसत होते. फोटो बघून मी उड्या मारू लागलो. नाचु लागलो आनंदाने पप्पांना भेटलो.
इतका छान सूर्यास्ताचा देखावा मी कधीही विसरणार नाही.
Explanation:
I Hope It Will Help You