मी पाहिलेले स्वप्न मराठी निबंध
Answers
■■ मी पाहिलेले स्वप्न ■■
आपण रोज झोपल्यावर कुठल्या न कुठल्या प्रकारची स्वप्नं पाहतो. काही स्वप्नं आपण विसरतो तर काही लक्षात ठेवतो.
याचप्रकारे, काही दिवस आगोदर मला एक विलक्षण स्वप्न पडले होते. या स्वप्नात मी एका जंगलात गेली होती. तिथे माझ्यासोबत माझ्या मैत्रिणी होत्या. आम्ही सगळे तिथे खेळत होतो. आम्ही जंगलचा कानाकोपरा बघत होतो. विविध झाडं व पक्षी पाहून आम्ही खूप खुश होतो.
अचानक एका कोपऱ्यातून आम्हाला डायनोसरची डरकाळी ऐकू आली. त्याचा आवाज ऐकताच आम्ही सगळे खूप घाबरलो. अचानक तो डायनोसर आमच्यासमोर आला. त्याला पाहून आम्ही जोरात पळू लागलो व तो आमचा पाठलाग करू लागला. आम्हाला कळेनासे झाले की आम्ही काय करावे.
आमच्या मनातील भीती वाढू लागली, अचानक त्या डायनोसरने मोठी उडी मारली व त्याने मला त्याच्या पंजाने त्याच्याजवळ खेचले. त्याने मला खाण्यासाठी त्याचे तोंड उघडले आणि मी जोरात किंचाळली. तेवढ्यातच आईचा आवाज ऐकू आला. डोळे उघडले तेव्हा कळले की हे स्वप्न होते. तेव्हा मला धीर आला!