Economy, asked by vimlakshkhadse, 1 year ago

मी राष्ट्रध्वज बोलतोय निबंध ​

Answers

Answered by krutika2006
52

Answer:

भारताच्या राजधानीत माझा मुक्काम होता. एकएक वास्तू निरखीत मी नव्या दिल्लीच्या रस्त्यांवरून हिंडत होतो. राष्ट्रपतिभवनासमोर उभा असताना त्या भव्य वास्तूवरील राष्ट्रध्वजाने माझे मन आकर्जून घेतले. खरे पाहता, राष्ट्रध्वज आपल्या पूर्ण परिचयाचा, पण आज त्या भव्य वास्तूवर वाऱ्याबरोबर फडफडणारा आमचा राष्ट्रध्वज मला आगळावेगळाच भासत होता त्याच्याकडे पाहत असतानाच मला असं वाटू लागलं की, जणू काही ध्वज माझ्याशी बोलत आहे. त्या विचारातच मी बागेत बसलो. निळया आकाशाच्या पार्श्वभूमीवर तिरंगा फडकत होता. मी एकटक त्याच्याकडे पाहत होतो. मला जणू तो सांगत होता

"तू माझ्याकडे एवढया आदराने पाहतोस. त्याचं कारण तुला माहीत आहे का?" राष्ट्रध्वज मला विचारत होता, “मी तुझ्या राष्ट्राचे प्रतीक आहे. मी म्हणजेच भारत. मला दिलेला सन्मान हा भारताचा सन्मान ठरतो. माझ्यामागे माझा उज्ज्वल इतिहास आहे. माझे आजचे हे रूप, आजचे हे स्थान मिळविण्यासाठी मला फार मोठ्या आपत्तीतून जावे लागले. माझ्या शूर सुपूत्रांची साथ मला सदैव लाभली.

Answered by sanajamadar06
19

Answer:

१८५७ पासून भारतीयांनी आपल्या गुलामीचे जोखड फेकून देण्याचा प्रयत्न चालवला होता. इंग्रजांच्या बलाढ्य शक्तीशी ते प्राणपणाने टक्कर देत होते. भारत पारतंत्र्यात असताना भारतीयांना मी सदैव 7व प्रेरणा देत होतो. प्रत्येक स्वातंत्र्य आंदोलनात अग्रभागी असे. माझ्या रक्षणासाठी माझ्या देखत अनेक बहाद्दरांनी आपल्या रक्ताचा सडा शिंपला. त्यांची स्मृती म्हणून माझ्या अंगावर केशरी पट्टा आला. काळाच्या ओघात माझा चेहरामोहरा वेळोवेळी बदलत गेला. हिरव्या व केसरी रंगामध्ये पट्टी आली. कधी माझ्यावर' वंदे मातरम' ही अक्षरे लिहिली गेली, तर कधी सूर्य, तर कधी चंद्र, कधी कमळ अशी चित्रे काढली गेली. 1920 नंतर मी तिरंगा बनलो व त्या काळी स्वदेशीचे प्रतीक असलेला चरका माझ्या छातीवर अभिमानाने मिरवू लागलो. स्वातंत्र्योत्तर काळात मला' राष्ट्रध्वज' होण्याचा मान लाभला, तेव्हा चरख्याची जागा सर्व भूम अशोक चक्रा ने घेतली.माझा केसरी रंग देशभक्ती आणि त्यागाचे प्रतीक आहे; तर माझा पांढराशुभ्र रंग शांती प्रथा आणि मांगले यांचे सूचक आहे; प्रसाद हिरवा रंग समृद्धीचा दर्शक आहे. माझ्यावरील निर्णय चक्र साऱ्या जगाला सूचित करते की, हेरायचे धर्म, नीती आणि न्याय त्याच्याच आधारे प्रगतीपथावर अखंड गतिमान राहील.

माझा केसरी रंग देशभक्ती आणि त्यागाचे प्रतीक आहे; तर माझा पांढराशुभ्र रंग शांती प्रथा आणि मांगले यांचे सूचक आहे; प्रसाद हिरवा रंग समृद्धीचा दर्शक आहे. माझ्यावरील निर्णय चक्र साऱ्या जगाला सूचित करते की, हेरायचे धर्म, नीती आणि न्याय त्याच्याच आधारे प्रगतीपथावर अखंड गतिमान राहील." मित्रा, आजवर अनेकांनी माझ्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावली. स्वातंत्र्यलढ्यात यांनी सर्वांगावर लाठ्या झेलल्या, तरी त्यांनी कधी माझा अपमान होऊ दिला नाही. हे स्वतंत्र सैनिक देशासाठी हसत-हसत फासावर चढले तेही मला छातीशी कवटाळून ! ते सारे रोमांचकारक सोनेरी क्षण आठवतात आजही माझे मन आनंदाने भरून येते.

माझा केसरी रंग देशभक्ती आणि त्यागाचे प्रतीक आहे; तर माझा पांढराशुभ्र रंग शांती प्रथा आणि मांगले यांचे सूचक आहे; प्रसाद हिरवा रंग समृद्धीचा दर्शक आहे. माझ्यावरील निर्णय चक्र साऱ्या जगाला सूचित करते की, हेरायचे धर्म, नीती आणि न्याय त्याच्याच आधारे प्रगतीपथावर अखंड गतिमान राहील." मित्रा, आजवर अनेकांनी माझ्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावली. स्वातंत्र्यलढ्यात यांनी सर्वांगावर लाठ्या झेलल्या, तरी त्यांनी कधी माझा अपमान होऊ दिला नाही. हे स्वतंत्र सैनिक देशासाठी हसत-हसत फासावर चढले तेही मला छातीशी कवटाळून ! ते सारे रोमांचकारक सोनेरी क्षण आठवतात आजही माझे मन आनंदाने भरून येते." 1947 साली 14 ऑगस्टच्या मध्यरात्री नंतर मी जेव्हा राष्ट्रस्तंभावर डोलाने विराजमान झालो, तेव्हा कोट्यवधी भारतीयांच्या डोळ्याचे पारणे फिटले. बाळा, तू एवढ्या अभिमानाने व कुतूहलाने माझ्याकडे पाहतोस, म्हणून मी तुझ्याशी मोकळेपणाने बोलतो आहे. नाहीतर आजचा युवक स्वतःच्याच विश्वात एवढा गुंतलेला असतो की, त्याचे माझ्याकडे कधी लक्ष जात नाही. माझा सन्मान म्हणजे भारतीयांचा- पर्यायाने तुमचाच- सन्मान आहे, हे त्याच्या ध्यानात येत नाही."

माझा केसरी रंग देशभक्ती आणि त्यागाचे प्रतीक आहे; तर माझा पांढराशुभ्र रंग शांती प्रथा आणि मांगले यांचे सूचक आहे; प्रसाद हिरवा रंग समृद्धीचा दर्शक आहे. माझ्यावरील निर्णय चक्र साऱ्या जगाला सूचित करते की, हेरायचे धर्म, नीती आणि न्याय त्याच्याच आधारे प्रगतीपथावर अखंड गतिमान राहील." मित्रा, आजवर अनेकांनी माझ्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावली. स्वातंत्र्यलढ्यात यांनी सर्वांगावर लाठ्या झेलल्या, तरी त्यांनी कधी माझा अपमान होऊ दिला नाही. हे स्वतंत्र सैनिक देशासाठी हसत-हसत फासावर चढले तेही मला छातीशी कवटाळून ! ते सारे रोमांचकारक सोनेरी क्षण आठवतात आजही माझे मन आनंदाने भरून येते." 1947 साली 14 ऑगस्टच्या मध्यरात्री नंतर मी जेव्हा राष्ट्रस्तंभावर डोलाने विराजमान झालो, तेव्हा कोट्यवधी भारतीयांच्या डोळ्याचे पारणे फिटले. बाळा, तू एवढ्या अभिमानाने व कुतूहलाने माझ्याकडे पाहतोस, म्हणून मी तुझ्याशी मोकळेपणाने बोलतो आहे. नाहीतर आजचा युवक स्वतःच्याच विश्वात एवढा गुंतलेला असतो की, त्याचे माझ्याकडे कधी लक्ष जात नाही. माझा सन्मान म्हणजे भारतीयांचा- पर्यायाने तुमचाच- सन्मान आहे, हे त्याच्या ध्यानात येत नाही." पाहता पाहता आवाज बंद झालं; मी मात्र आमच्या शाळेसमोरच्या चौकात ध्वजस्तंभावर डोलाने फडकत असलेला राष्ट्रध्वज पाहून मनोमनी सुखावलो होतो. नतमस्तक होऊन, राष्ट्रध्वजाला वंदन करून मी माघारी वळलो

Similar questions