मूर्ती तयार करण्याचा उद्योग
Answers
मृत्तिका उद्योग या संज्ञेने कुंभारकाम म्हणजेच मडकी, घागरी, माठ, कुंड्या, कौले, विटा, फरश्या इ. मातीच्या वस्तू बनविण्याचा व भाजून त्या पक्क्या करण्याचा धंदा असा अर्थ ध्वनित होतो. इंग्रजी भाषेतील ‘सेरॅमिक्स’ ह्या शव्दाचा अर्थ भाजलेली वस्तू. हा शब्द या अर्थाच्या KERAMOS या ग्रीक शब्दावरून आलेला आहे. त्यामुळे मानवी संस्कृतीच्या सुरुवातीच्या काळात काळ्या अथवा लाल मातीच्या बनविलेल्या व भट्टीत भाजून काढलेल्या वस्तू तयार करण्याचा धंदा असाच या संज्ञेचा अर्थ केला जातअसे. आजही पुरातत्त्वविद्येच्या संदर्भात असाच अर्थ घेतला जातो परंतू इतरत्र या संज्ञेची व्याप्ती पुष्कळच वाढली आहे.
आधुनिक व्याख्येप्रमाणे धातू व मिश्रधातू वगळून इतर अकार्बनी द्रव्यांपासून उच्च तापमानयुक्त प्रक्रियांनी तयार होणाऱ्या पदार्थांचा, त्याचप्रमाणे असे पदार्थ व धातू अथवा मिश्रधातू यांच्या एकत्रित उपयोगाने मिळणारे पदार्थ (सेरमेटे) आणि आयर्न ऑक्साइडाबरोबर काही ऑक्साइडांचा (उदा., लोह, निकेल, कोबाल्ट व जस्त) संयोग करून बनविलेले चुंबकीय पदार्थ (फेराइटे) या सर्वांचा अंतर्भाव मृत्तिका उद्योगात होतो. त्यामुळे चिनी मातीसारख्या पांढऱ्या मातीपासून बनविलेल्या व पृष्ठभागावर चकचकीत झिलई असलेल्या वस्तू उच्च तापमान सहन करतील (उच्च तापसह) अशा विटा व पात्रे, तसेच अपघर्षक (खरवडून व घासून पृष्ठभाग गुळगुळीत करणारे पदार्थ), काच, सिमेंट व तत्सम पदार्थ मृत्तिका उद्योगात येतात.
विश्वकोशामध्ये ⇨ अपघर्षक, ⇨ उच्चतापसह पदार्थ, ⇨ एनॅमल, ⇨ काच, ⇨ फेराइटे, ⇨ सिमेंट व ⇨ सेरमेटे यांवर स्वतंत्र नोंदी आहेत म्हणून प्रस्तूत नोंदीत त्यांचा समावेश केलेला नाही. येथे प्रथम कुंभारकामासंबंधीची माहिती दिलेली असून नंतरमोठ्या प्रमाणावर आधुनिक मृत्तिका वस्तू तयार करण्यासंबंधी माहिती दिलेली आहे.
कुंभारकाम : खेड्यातील कुंभार जवळपास मिळणारी शेतातील, तलावातील अथवा नदीकाठची माती थोडीफार कमावून साध्यासुध्या यंत्रसामग्रीने मडकी, माठ, विटा, कौले .इ सामान्य वस्तू ग्रामोद्योगाच्या पातळीवर बनवितो. त्याचे मुख्य यांत्रिक साधन म्हणजे चाक व साचे. यांशिवाय वस्तूची जाडी ठाकठीक करून घेण्यासाठी चोपणे नावाची एक लहानशी हातोडी, बहिर्वक्र आकाराचा एक दगड (गंडा) व वस्तूला चकाकी आणण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या मण्यांची एक माळ, शिंपले अगर बांबूचा तुकडा ही इतर साधनेही तो वापरतो