Math, asked by call2karunachouhan, 4 months ago

मारतीय शेतकरी. निबंध इन मराठी ​

Answers

Answered by gojalchand03031975
0

Answer:

1st kgzxbbzcgksn, charging CFO.

Answered by llTheUnkownStarll
4

उत्तर:

भारतात सर्वात अभागी जीव म्हणजे शेतकरी. तो सर्वांना अन्न पुरवितो मात्र स्वतः कुपोषित असतो. वस्त्रासाठी कापूस पिकवितो पण त्याला अंगभर कपडे नसतात. ऊन,पाऊस,वारा, थंडी याची पर्वा न करता शेतात राबतो परंतु त्याच्या कष्टाचा योग्य मोबदला त्याला मिळत नाही. लाखो रुपयाच्या शेतीचा तो मालक असतो परंतु वेळ प्रसंगी खिशात रुपया नसतो. वर्षानुवर्ष कर्ज घ्यायची त्याला गरज पडते. कर्जासाठी बँकेत व सावकाराच्या घरी चकरा मारुन दमतो तेव्हा त्याच्या यातना त्याला आत्महत्येस प्रवृत्त करत असतात.

भारतीय शेतकरी हा शेतमालाचा केवळ उत्पादक आहे. त्याला शेतमालाचा भाव ठरविण्याचा अधिकार नाही. पुढील काही ओळीतून त्याची स्थिती स्पष्ट होते.

त्यामुळे भारतीय शेतकरी हा पिढ्यान पिढ्या दरिद्री असतो. परंतु याच शेतकऱ्यांच्या जीवावर व्यापारी मात्र श्रीमंत होत असतो. कोणताही घाम न गाळता, कोणतेही कष्ट न करता. त्यामुळे भारतीय व्यापारी वर्ग हा शेतकऱ्यांना छळणारा ठरत आहे.शेतकऱ्यांना छळणारा आणखी एक वर्ग म्हणजे बियाणे कंपन्या तथा कीटक नाशके व खतांच्या कंपन्या. ह्या सर्व कंपन्यांच्या सर्व उत्पादनाचे भाव सतत वर वर चढत असतात. शेतकऱ्यांजवळून मातीमोल किमतीने घेतलेल्या पिकांवर प्रक्रिया करुन सोन्याच्या भावाने बियाणे विकल्या जाते. 

शेतकऱ्यांचा माल घेतांना मात्र भाव सारखा खाली खाली घसरत असतो. वन्य प्राण्यांचा संरक्षण कायदा हा सुद्धा शेतकऱ्यांच्या जीवावर उठला आहे. हरीणांचे कळप, नील गाईचे कळप, डुकरांचे कळप शेतात हैदोस घालून हजारो हेक्टर पीक फस्त करत असतात. परंतु कोणतीही तक्रार न करता तो निमुटपणे सहन करतो.

भारतात पावसाची अनियमितता ही पिकांच्या नुकसानास कारणीभूत ठरते. तसेच अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, पूर, वादळ वाऱ्यासह गारपीट, पिकांवर येणारी कीड, विविध रोग इत्यादी मुळे पिकांचे नुकसान होवून उत्पन्न घटते. एक प्रकारे निसर्ग सुद्धा त्यांच्यावर अन्याय करीत असतो.वरील सर्व अडचणींवर मात करुन मोठ्या हिमतीने परिस्थितीवर शेतकरी मात करीत असतो व आपली तथा देशाची अन्नाची गरज भागवीत असतो.

अशा कष्टाळू शेतकऱ्यास माझे अभिवादन!

THANKS

BE BRAINLY

Similar questions