मी सागरातील एक मासा मराठी निबंध
Answers
■■ मी सागरातील एक मासा■■
नमस्कार मुलांनो, मी एक मासा बोलत आहे. मी माझ्या कुटुंबासोबत आणि मित्र मैत्रिणींसोबत समुद्रात राहतो. आम्ही सगळे इथे खूप मजेत राहतो.आम्ही पाण्यात खेळतो, खोल सागरात जातो, पाण्यामध्ये उड्या सुद्धा मारतो.
आम्ही मासे मानवजातीसाठी खूप उपयोगी ठरतो. आमचा उपयोग वेगवेगळ्या वस्तू बनवण्यात, औषध,सौंदर्य प्रसाधने बनवण्यासाठी, खाण्याचे स्त्रोत म्हणून केले जाते.
पण, तुम्ही लोकं आमच्याशी फार वाईट वागता. तुमच्यामुळे होत असलेल्या जल प्रदूषणाचा आम्हाला खूप त्रास होतो. आमच्या आरोग्यावर याचा वाईट परिणाम होतो.
तुम्ही आम्हाला खाता.अहो! तुम्ही आम्हाला खायच्या आगोदर हा विचार का नाही करत की आमचा सुद्धा जीव आहे.
आम्हाला सुद्धा तुमच्यासारखे या सुंदर दुनियेत जगावेसे वाटते, आमच्या कुटुंबासोबत आणि मित्र मैत्रिणींसोबत खेळावेसे वाटते. आम्हाला सुद्धा तुमच्यासारखे आमच्या कुटुंबासोबत जीवनाचा आनंद घ्यायचा आहे.
पण, तुम्ही मनुष्य हा विचार करत नाही. पुढच्या वेळी कोणत्याही मासा खायच्या आगोदर माझे म्हणणे लक्षात घ्या.
चला आता निरोप घ्यायची वेळ आली.
Answer:
TtttQqqqqqqExplanation: