मां से माझे गाव मराठी निबंध
Answers
माझे गाव
मि शहरातल्या शाळेत शिकत आहे आणि आत्ता लवकरच शाळेला सुट्टी लागणार आहे तेव्हा मला एकाच गोष्टीची ओड लागली आहे ती म्हणजे मज्या गावा ला जाण्याची.
माझ्या गावाचे नाव रामपूर आहे ते अगदी डोंगरांच्या पायथ्याशी स्तित्त आहे. आमचे गावा मदे एक शोटेशे घर आहे आत्ता त्या घरा मधे मला लाड करणारे म्हणजे आजी आजोबा राहतात. सुट्टी लागली कि मी नेहमी आमच्या गावात येतो.
माझ्या गावच सांगायचं झाला तर, गाव मदे सर्व लोकांची घरे एक सारखीच आणि गमंत म्हणजे इथे शहरासारखे बिल्डीन्गिंगचे पर्वत नसून हिरवे गार असलेले खरोखार्चेह पर्वत बगायला मिळतात. गावा बाहेर एक छोटी नदी आहे जिथे मी आणि माझे गावातील सर्व मित्र अंगोल करायला जातो, मला तर खूपच माज्या येते.
गावाकडे प्रत्येका कडे प्राणी बगायला मिळतात गाय, बैल, घोडा, कुत्रा, बकरी, आणि मांजर. मला तर एकदा गावात गेलो कि कधी दुधाची कमी होत नाही इथे दुधा ची चव खूपच भारी असते मला तर ते पितच रहावे असे वाटते.
कुटला सण असला कि गावातली सर्व लोक एकत्र येतात आणि तो अगदी गोडी ने साजरा केला जातो इथे कोणता हि जातीभेद केला जात नाही. लोक अगदी एकमेकाच्या मदती साठी नेहमी तयार अस्तात.
मि गावतले मित्रांन बरोबर क्रिकेट खेळतो, नदी वर पोहायला जातो मला त्यांचा बरोबर खूप मज्या येते. अशे आमचे शोटे गाव आहे. मला माजे गाव खूप खूप आवडते.
Explanation:
________________
माझे गाव मराठी निबंध
_________________
___________________________________
माझे गाव... एक आदर्श गाव...
_____________________________________
माझे गाव लोणखेडा .मी महाराष्ट्रातील लोणखेडा गावी राहते . पाच मिनिटांच्या अंतरावर तालुक्याचे शहादा गाव आहे. आमचे गाव लोणखेडा हे गोमती नदीच्या किनारी बसले आहे.त्यामुळे गावात शेतात जलसिंचनाची कामे केली जातात व भरपूर उत्पन्न मिळवले जाते.
लोणखेडा येथे पूज्य साने विद्या प्रसारक मंडळ महाविद्यालय आहे.येथील परिसरातील ,पंचक्रोशी तील , गावातील विद्यालय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संस्था म्हणून नावलौकिक आहे.
लोणखेडा त्याच्या पूर्वेला तीन चार किलोमीटर अंतरावर सातपुडा कारखाना आहे .यामुळे परिसरातील तरुणांना रोजगार मिळतो.अशा प्रकारच्या औद्योगिक वसाहतींमुळे देशातून विविध राज्यातून काही कुटुंबे येथे वसली आहेत. लोनखेडा येथील त्यांना रोजगार मिळतो व त्यांचा उदरनिर्वाह चालतो.
आमच्या गावात दरवर्षी वृक्ष रोपणाचा कार्यक्रम होतो .गावाच्या विविध प्रकारचे झाडे लावली आहेत .त्यामुळे आमच्या गावात हिरवळीने नटलेले आहे .गावात विद्यालय,महाविद्यालय पण आहे.त्यामुळे माझे गाव साक्षर आहेत .आमच्या गावात दारूबंदी, नशाबंदी आहे.
आमचे गाव तंटामुक्त आहे .येथे सर्व मिळून मिसळून राहतात .गावात कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही व सर्व आपले काम करतात.आमच्या गावची ग्रामपंचायत खूपच छान आहे .गावात दवाखाना ,पोस्ट ऑफिस आहे .
गावकरी खूपच कष्टकरी आहे.दिवसभर आपल्या शेतामध्ये काम करतात .गावात वेगवेगळे सण व उत्सव परंपरे नुसार खूप प्रेमाने उत्सव साजरे केले जातात .गावात होळी, जन्माष्टमी ,स्वातंत्र्य दिवस सारखे सर्व उत्सव साजरे होतात.
आजच्या आधुनिक काळात आमच्या गावात डिजिटल ग्रामपंचायत सुरू झाली आहे .यामुळे गावाच्या विकास होण्यास मदत होते .ई-सेवा केंद्र ,स्वस्त धान्य दुकान व ग्रामपंचायती संकुल तयार करण्याचे काम सुरू आहे .यामुळे व्यवसायाची संधी उपलब्ध होत आहे.
गावात बचत गटांची स्थापना करण्यात आली आहेत.खरंच आमचे गाव खुप सुंदर आहे . मला माझा गावाच्या अभिमान आहे.
________________________
माझे गाव ,स्वच्छ गाव
____________________________