मासेमारी या उद्योगाच्या विकासासाठी असलेल्या शासकीय धोरणांची माहिती सांगा?मासेमारी या उद्योगाचे विकासासाठी असलेल्या शासकीय धोरणाची माहिती सांगा
Answers
Answer:
मानवी आहारात माशांना महत्त्वाचे स्थान आहे. आहाराशिवाय रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे क्षेत्र म्हणूनही मत्स्य व्यवसायाचे महत्त्व आहेच. अन्न आणि उदरनिर्वाहाची मोठी क्षमता या उद्योगात दडलेली आहे. सागरात जशी मासेमारी होते, तशीच देशांतर्गतदेखील मासेमारी होते. विविध तलाव, नद्यांचे पात्र येथे मासेमारी चालते. नाशिक विभागातील उपलब्ध नैसर्गिक जलाशये, धरणे आणि नैसर्गिक वातावरण मत्स्यव्यवसायासाठी अत्यंत पूरक आहे. मात्र, असे असूनही उत्तर महाराष्ट्रात अजूनही मत्स्यव्यवसाय काही ठराविक घटकांपुरताच मर्यादित राहिलेला दिसून येतो. नैसर्गिक संसाधने पुरेपूर उपलब्ध असतानाही मत्स्य व्यवसायाला प्रतिष्ठा मिळणे बाकी आहे. सरकारतर्फे मत्स्य व्यवसायला चालना मिळावी यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून टॉनिक देण्याचा प्रयत्न सुरू असला तरी त्याला कागदोपत्री आणि नियमावलीचा जाच जास्त आहे. शेतकऱ्यांना या व्यवसायात उतरवण्यासाठी सरकारकडून धडक कार्यक्रम अद्याप तरी हाती घेतलेला नाही. आज जागतिक मत्स्य व्यवसाय दिन आहे. त्यानिमित्ताने नाशिक विभागातील मत्स्यव्यवसायाचा घेतलेला हा आढावा...
Explanation: