मी सह्याद्री बोलतोय मराठी निबंध (५०० शब्दात)
Answers
Answer:
मी सह्याद्री बोलतोय
वीस हजार छायाचित्रांतून तुमच्याशी थेट सह्याद्री संवाद साधणार आहे. रौद्रसुंदर सह्याद्रीला लघुपटाच्या माध्यमातून बोलतं करण्याची किमया साधलीय, विवेक काळे या तरुणानं.
सह्याद्रीविषयी तुम्हाला काय माहिती आहे..? असा प्रश्न कुणी विचारलाच तर महाराष्ट्राचा इतिहास आणि भूगोलाला ज्या पाषाण पर्वतानं जिवंत केलं तो सह्याद्री हे उत्तर मराठी मन तात्काळ देईल; पण त्याही पलीकडं असणारा सह्याद्री तरुणांनी पाहावा, त्यासाठी योगदान द्यावं या हेतूनं विवेक काळे हा तरुण झटत आहे. तब्बल वीस हजार स्थिर छायाचित्रांतून त्यानं ‘मी सह्याद्री बोलतोय’ हा लघुपट बनवला असून त्याद्वारे तो सह्याद्रीला घराघरात पोहोचवणार आहे.
लघुपटात काय उलगडणार?
सह्याद्री म्हणजे पश्चिम घाट. हा आपल्या देशाचाच नव्हे तर जगाचा एक महत्त्वाचा ठेवा आहे. जैवविविधतेत जगातल्या महत्त्वाच्या ३५ विभागांत सह्याद्रीची गणती होते. सह्याद्रीत पशु, पक्षी, वनस्पती, उभयचर व किटकांच्या अनेक अंतर्जन्य व दुर्मिळ जाती आढळतात. अंतर्जन्य म्हणजे अशा जाती ज्या पश्चिम घाटाव्यतिरिक्त जगात इतरत्र कुठे ही आढळत नाहीत. दुर्गम डोंगराळ प्रदेश, त्यातील विविध भौगोलिक परिस्थिती, पावसाळ्यातलं आर्द्र हवामान, अग्नीजन्य खडक आदी घटकांमुळं सह्याद्रीच्या अनोख्या अधिवासात या प्रजाती निर्माण झाल्या.
दक्षिण व पश्चिम भारतातल्या बहुतांश नदया सह्याद्रीत उगम पावतात. कावेरी, कृष्णा, गोदावरी, भीमा या प्रमुख नदया आणि उपनदया संपूर्ण पश्चिम व दक्षिण भारताच्या जीवनदायिनी आहेत. तिथून येणाऱ्या पाण्यावर उद्योगधंदे, शेती आणि एकंदरच जगणं अवलंबून आहे. या नद्यांची उगमस्थानं, तिथली जंगलं यांचं संवर्धन होणं महत्त्वाचं आहे.
अनियंत्रित पर्यटन, थंड हवेसाठी घाटमाथ्यावर होणारं शहरीकरण, जंगलतोड व खाणकाम यामुळं सह्याद्रीचा ऱ्हास होत आहे. हे सगळं तरुणांना समजावं आणि त्याच्या संवर्धनासाठी तरुणांनी पुढं यावं या हेतूनं ‘मी सह्याद्री बोलतोय’ या लघुपटाची निर्मिती केल्याचं विवेकनं सांगितलं.
जलद छायाचित्रकाव्य पद्धतीनं बनवलेला हा लघुपट भारावून टाकणारा आहे. पाच वर्षांच्या या उपक्रमातून आंतरराष्ट्रीय दर्जाचा भावूक चित्रपट बनावा असं विवेकचं ध्येय आहे. लघुपटाचा पहिला भाग सह्याद्रीसाठी झटणाऱ्या स्वयंसेवकांना नवी उमेद देईल आणि अधिकाधिक तरुण सह्याद्रीसाठी पुढे येतील असा विवेकला विश्वास आहे.
Explanation: