मी शाल बोलतोय याचा वर आत्मकथन
Answers
Answer:
नमस्कार बालकहो,
मी शाळा बोलतेय, हो तुमची शाळाच बोलतेय… अस अनोळखी होवून पाहू नका. खरच मी तुमची शाळा बोलतेय, ओळखलत नाही का मला? पण मी मात्र ओळखते तुम्हाला… आता बरेचसे चेहरे बदललेत…. ज्या बालवयात मी तुम्हाला पाहिलं होत… ते चेहरे बदलले. तुम्ही मोठे झालात, आपापल्या संसारात रमलात. मी मात्र आहे तशीच गावच्या मध्यभागी… तरीही एकाकी.… पण मी बदलले नाही…. आहे तशीच आहे. थोडा बदल झाला माझ्यात, तुमाच्यातल्याच एकाने हात दिला मला मदतीचा. आणि मी पूर्वी पेक्षा एका माळ्याने, मजल्याने वाढले फक्त.… आपलं संपुष्टात येणार अस्तित्व टिकवण्यासाठी.
पण मला आजही आनंदच वाटतो… मी एकाकी कसली हो….!!
अजिबात नाही. वाटलं होत कि तुम्ही माझ्या अंगणात वाढलात, शिकलात, पडलात, रडलात आन घड्लात ही… अगदी तशीच तुमची मुल ही माझी पायरी चढतील. माझ्या अंगणात बगडतील. पण नाही… कदाचित हे माझ दुर्भाग्य असावं. वाईट या गोष्टीच वाट्त की, तुम्ही माझ्या बाजूने जातानाही अभिमानाने आपल्या मुलांना सांगत ही नाही की, बाळा ही माझी शाळा… मी या इथे शिकलो, इथे घडलो… चल तुला मी माझी शाळा दाखवतो…
अस बोलला असतात तरी माझ समाधान झाल असत. मी तृप्त झाले असते.
असो, हा माझ्या दुर्भाग्याचा विषय…
पण अजूनही वेळ गेली नाही. आजही तुमच्या भावाची, काकाची, नातवाची, पुतण्याची, बहिणीची मुले माझ्या अंगणात घड्तायत… मोठी होतायत, खूप हुशारही आहेत. विविध क्षेत्रात पारंगत आहेत. त्याना मी तुमची मुले… तुमचच रूप समजते.
आजच्या तंत्रज्ञानाने प्रगत… नव्या युगात तुम्ही मात्र आधुनिक होत गेलात. पण मी मात्र परतीच्या पावलासारखी दोन पावले मागेच राहिले. माझ्याकडे या नव्या आणि आधुनिक जगात… त्यांना देण्यासारख काहीच नाही. तेच जुने पुराने बाक, उघड अंगण, माझ्या भिंतीही आता जुनाड आन ढिसाळ दिसू लागल्यात, ना सभागृह, ना लघुशंकेसाठी सुसज्ज व्यवस्था, मुलांच्या प्राथमिक गरजाच मी पूर्ण करू शकत नाही. तर आधुनिक पद्दतीच शिक्षण कस देवू शकेन?. हे पाहून मलाच माझी खंत वाटतेय
माझ्या या अवस्थेला आज जबाबदार कोण? तुम्हीच सांगा मी कुणाकडे बोट दाखवू. तुमच्यासाठी येथे राबतेय, तुम्हास घडवतेय, सावरतेय अस आपलं आई मुलाच नातं… मला आधार देण्यास तुम्ही का नाही पुढे येत? का नाही खुलवत पुन्हा येथे नंदनवन…?
बाळांनो, मी आज तुम्हास साद घालतेय…. या परतुनी पुन्हा…. अस काहीतरी करा कि तुमची मुलं माझ्या अंगाखांद्यावर बागडतील, तुम्ही शहरात नाही तर इथे रहाल. माझ्या समोर. माझे बनून…
खूप वाईट वाटतय की माझीच काही मूलं माझ्या समोरून आपल्या मुलाच्या पाठीवर दप्तर टाकून बाहेरच्या शाळेत पाठवतात. तेंव्हा ज्या काही वेदना होतात त्या माझ्या मलाच ठावूक.
का तुम्हाला मी आवडत नाही ? कि तुमच्या योग्यतेची मी आता उरली नाही.?
मी बदलायला तयार आहे. पण माझ्यात तो बदल तुम्ही घडवा.
करा मला आधुनिक…. द्या माझं वैभव पुन्हा मला. उठा एक व्हा…!! आणि घडावा पुन्हा…. तो इतिहास जो तुमच्या वडीलधारयांनी नी घडवला. मला तुमच्या गावात आणली…. तुमच्या सेवेसाठी.
मी खूप आशेने तुमच्याकडे पाहत आहे. उठा आणि संघटीत व्हा…!! मी दयेची याचना करतेय. घडवा पुन्हा आयुष्य तुमच्या पाल्यांच जे आज माझ्या अंगणात शिकतायत. मला पहायचय की माझा विद्यार्थी हा गाव सोडून शहरात नाही तर गावात राहून मोठा झालेला. शिकून मोठा अधिकारी झालेला, डॉक्टर, कलेक्टर झालेला.
मला पहायचय…
मला पहायचंय… जे गेल्या अनेक वर्षात घडलं नाही ते पहायचंय
पदर पसरते तुम्हासमोर….
माझी एवढी इच्छा पूर्ण करा.
माझी एवढी इच्छा पूर्ण करा.
निघते ……….
आता खूप उशीर झालाय.
तुम्हालाही तुमची कामं आहेत. तुम्हालाही तुमच विश्व आहे,
तुम्हालाही तुमचा सुखा समाधानाचा संसार आहे.
निरोप घेते आता…। खरच उशीर झालाय.
चलते…. चलते…आता माझा निरोप घ्या… पुन्हा मला भेटण्यासाठी…
धन्यवाद…. !!!