मातृभाषेचे मनोगत eassy in Marathi
1 page
Answers
•• मातृभाषेचे मनोगत ••
नमस्कार मित्रांनो,
सर्वप्रथम मराठी भाषा दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
ओळखल का मला? मी तुमची सर्वांची लाडकी मराठी भाषा बोलतेय .अलीकडे माझे महत्त्व कमी झाले आहे असे मला वाटत आहे. कारण लहानग्या मुलापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत सर्वजन इंग्रजीमध बोलण्याचा प्रयत्न करतात .का? तर ते या तंत्राद्यानाच्या युगात मागे राहू नये म्हणून. पण माझे महत्त्वही तेवढेच आहे जेवढे इंग्रजी आणि हिंदी भाषेचे आहे.आपण ज्या प्रदेशात राहतो ती आपली मातृभाषा होते.त्या अर्थी मी तुमची मातृभाषा आहे.कारण लहान मुल जेव्हा पहिला शब्द बोलतो तो मराठीतूनच असतो.
म्हणून असे म्हटले जाते- "माझी मराठी ही माय जशी दुधावरली साय
बाळा बोलाया शिकविते सरस्वतीचा वास तिच्यामंदी हाय"
आज २७ फेब्रुवारी आहे म्हणजेच माझा दिवस.आज कविवर्य वि.वा.शिरवाडकर म्हणजेच आपल्या सर्वांचे आवडते कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. हा दिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. कवी कुसुमाग्रजांनी मराठीतून अनेक साहित्य, कथा,कादंबऱ्या लिहिल्या. त्यावर त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले. मराठी भाषेतून ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे कवी होय. आपण सर्वांनी "नटसम्राट" हा सिनेमा नक्कीच पहिला असेल. तो देखील त्यांच्याच साहित्यातून घेतला आहे.
आपल्या देशात अनेक संत होऊन गेले त्यांनी देखील मराठी भाषेचे महत्त्व पटवून देताना म्हटले आहे-
"माझिया मराठीची बोलू किती कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके."
या मराठी दिनी मला एवढेच म्हणायचे आहे कि मराठी भाषा ही आपली मायबोली आहे तर तुम्ही सर्वांनी तिचा आदर केला पाहिजे आणि आपल्या दैनंदिन जीवनात तिचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. शेवटी मी एवढेच म्हणेन-
"माझ्या मराठीची गोडी मला वाटते अवीट माझ्या मराठीचा छंद मना नित्य मोहवीत"
अशी रसाळ मायबोली व्ह्रुद्यात घेत असे ठाव कोठे आहे का अशी बोली असेल तर मजला दाव."
hope it helps you .
pls follow me .
I have already followed u.
Answer:
मानवाने प्रथम नैसर्गिकरित्या मिळवलेली त्यांची मातृभाषा. मातृभाषा ही मुलाचे पालक त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी वापरत असलेल्या भाषेशी संबंधित असते किंवा एखादी व्यक्ती ज्या ठिकाणी जन्माला येते आणि वाढलेली असते तिथल्या सामान्य भाषेला मातृभाषा म्हणतात. अधिक प्रभावी संवादासाठी मानवी सामाजिक गरजेसाठी भाषा तयार केली गेली. अत्यंत क्लिष्ट किंवा बहुमुखी कोड, म्हणजे भाषा, आपले विचार आणि अनुभव इतर लोकांसमोर व्यक्त करण्यासाठी वापरली जाते. यामुळे भाषा ही एक नैसर्गिक घटना बनते जी माणसाला इतरांसमोर व्यक्त करण्याच्या इच्छेने लहान वयातच शिकते.
मातृभाषा किंवा मातृभाषा ही एखाद्याच्या संगोपनातील एक आवश्यक पैलू आहे कारण ती जगाकडे पाहण्याचा मार्ग आणि एखाद्या व्यक्तीने स्वतःला इतरांसमोर व्यक्त करण्याचा मार्ग तयार केला आहे. लहान मुले जे पाहतात किंवा ऐकतात त्याचे अनुकरण करतात. लहान मुले ही जलद शिकणारी असतात कारण ते त्यांच्या पालकांचे अनुकरण करून त्यांची मातृभाषा आत्मसात करतात. नवीन भाषा शिकणाऱ्या प्रौढांच्या तुलनेत मुलांसाठी त्यांच्या वाढत्या वर्षांमध्ये भाषा शिकणे सोपे आहे. एखाद्याच्या मातृभाषेवर मजबूत पकड असणे अतिरिक्त भाषा शिकण्यासाठी एक मजबूत पाया तयार करण्यास देखील मदत करते. लहान वयातच मुलं त्यांच्या मातृभाषेशिवाय इतर भाषा शिकण्यास सक्षम असतात आणि एखाद्या भाषेची वेगळी रचना इतर भाषांमध्ये हस्तांतरित करून. जर एखाद्या मुलाने त्यांच्या मातृभाषेचे व्याकरण चांगले शिकले तर ते वेगवेगळ्या भाषांमधील शब्दांच्या अर्थाचा अंदाज लावू शकतील.
वेगवेगळ्या प्रदेशातील लोकांची मातृभाषा भिन्न असल्याने, म्हणूनच अनेक संस्था आणि पालक मुलांना दुसरी भाषा शिकवतात जेणेकरून ते कोणत्याही भाषेच्या अडथळ्यांशिवाय अधिक लोकांशी संवाद साधू शकतील. एखादी व्यक्ती अनेक भाषांमध्ये संभाषण करू शकते, परंतु जर त्यांच्याशी त्यांच्या मातृभाषेतून बोलले गेले, तर त्यांच्यामध्ये ओळखीची भावना प्रबळ होते.
#SPJ2