India Languages, asked by santoshiRajeshpatil, 6 months ago

मातीचे प्रदूषण या विषयावर माती आणि माणूस यात संवाद लिहा in marathi​

Answers

Answered by Genius9481
4

Answer:

marathi mala aati nahi

Answered by kalpanachavan053
0

माणूस : शी या मातीने माझा पाय माखला किती त्रास हा मातीचा कंटाळा येतो या मातीचा | माती खरं आहे तुझे म्हणणे माझ्यामुळे तुझे पाय खराब होतात.

माणूस : नुसते खराब होत नाहीत, तर जंतुसंसर्ग होतो. मग, औषधे लावावी लागतात.

माती : अगदी बरोबर सांगितलेस तू माझ्यामध्ये खूप जंतू असतात. त्याचा संसर्ग होतो. पण तू चप्पल, बूट, पोजे घालतोस ना ?

माणूस : हो घालतो ना तरीपण कुठे ना कुठे माती लागतेच. बरं, उन्हाळ्यात तू खूप तापतेस मग माझे पाय भाजतात.

माती : तुझेच काय, सगळ्यांचे पाय भाजतात. मान्य आहे मला मी सूर्याची प्रखर उष्णता शोषून घेते. त्यामुळे वातावरणातील तापमान मर्यादित राहते.

माणूस : पावसाळ्यात तुझा सगळीकडे चिखल होतो. तेव्हा मातीत पाय ठेवावासा वाटत नाही..

माती बघ बाबा, तुला त्रास होतो तर नको ठेवूस पाय! असेच जर शेतकऱ्याने ठरवले तर काय होईल? जरा विचार करून सांग.

माणूस : हं हं... पटतंय खरं तुझं म्हणणं ! शेतकरी आमचा अन्नदाता आहे. मातीशिवाय तो धान्य पिकवू शकत नाही.

माती : फक्त एवढेच नाही ! फळझाडे, फुलझाडे, औषधी वनस्पती, भाजीपाला, गवत माझ्यामधूनच उगवतात. माझ्याबद्दल घृणा निर्माण करण्यापेक्षा माझ्याशी मैत्री कर! तुला हे माहीत आहे का? की मला तयार व्हायला हजारो वर्षे लागतात. बरं मला प्रदूषित तुम्हीच करता कचरा, घाण माझ्यावर टाकता. मी दूषित होते. तुम्हांला त्याचा त्रास सहन करावा लागतो.

माणूस : समजलं मला! मी पुन्हा माती प्रदूषित करणार नाही.

Similar questions