Geography, asked by AtoZ001, 4 months ago

मातीच्या भांड्यांचा जास्तीत जास्त वापर का करावा??
give correct answer...quick​

Answers

Answered by ayushraj7281
14

Answer:

आजही आपल्याला बऱ्याच घरांमध्ये मातीचा माठ दिसून येतो. नैसर्गिक थंड पाण्यासाठी याचा उपयोग केला जातो. पण तुम्हाला माहीत आहे का? पूर्वीच्या काळात पदार्थ बनवण्यासाठीही मातीच्या भांड्यांचा वापर करण्यात येत असे. पण आता अल्युमिनिअम आणि इतर भांड्यांचा वापर करण्यात येतो. मातीच्या भांड्याचा वापर आता जवळजवळ नाहीसाच झाला आहे. काही ठिकाणी फक्त दही लावण्यासाठी मातीच्या भांड्याचा वापर करण्यात येतो. खरं तर मातीच्या भांड्यांमध्ये जेवण तुम्ही शिजवून खाल्ल्यास, तुम्हाला नैसर्गिक फायदा जास्त मिळतो. आपले स्वास्थ्य सुरक्षित राहण्यासाठी याचा अधिक लाभ होतो. कारण मातीच्या भांड्यातून अन्न शिजवल्यास, अनेक पोषक तत्व मिळतात जी अनेक आजारांपासून आपल्याला दूर ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात. जाणून घेऊया नक्की काय होतात आपल्या शरीरासाठी मातीच्या भांड्याचे फायदे -

निरोगी शरीरासाठी गरजेचं

आपल्या शरीराचं स्वास्थ्य टिकवून ठेवायचं असेल तर तुम्ही जे अन्न प्रेशर कुकरमध्ये शिजवता त्याऐवजी मातीच्या भांड्यांमध्ये हे शिजवा. आयुर्वेदानुसार सहसा कोणताही पदार्थ शिजताना त्या पदार्थाला हवेचा स्पर्श होणं अत्यंत गरजेचं असतं. पण प्रेशर कुकरमध्ये अन्न शिजताना मात्र अन्न शिजण्याऐवजी ते उकळतं. तसंच ते पटकन शिजतं आणि सर्वात महत्त्वाचं तर अन्न हळूहळू शिजणं आवश्यक आहे. पण आपल्याकडे इतका वेळ नसतो. त्यामुळे आपण हा पर्याय अवलंबतो. प्रत्येक व्यक्तीच्या शरीराला साधारण 18 पोषक तत्वांची गरज असते. मातीच्या भांड्यातून ही सर्व पोषक तत्व मिळतात. त्यापैकी कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, सिलिकॉन, कोबाल्ट आणि अशी अनेक पोषक तत्व मिळतात.

Answered by savitajagdale178
1

Answer:

भांड्यांचा

भांड्यांचा

Similar questions