मि तुमची शाळा बोलते निबंध
Answers
Explanation:
खरं तर तुमच्या गोंगाटानेच माझ्यात जिवंतपणा येतो….तुमच्या दुडूदुडू पावलांनी माझं अंगण कसं भरुन पावतं… माझ्यात चैतन्य संचारते…पण आज मी त्याला मुकली आहे …
तुमच्याशिवाय माझं अस्तित्व शून्य …Mi shala bol..
तुमचा नी माझा ऋणानुबंध पिढ्यान पिढ्यांचा…कित्येक पिढ्यांना मी शहाणे करुन सोडलं……माझ्या अंगाखांद्यावर खेळवलं…माझ्याच समोर तुम्ही लहानाचे मोठे होत आहात…तुम्ही मला कधीच टाळू शकत नाही… परंतु आता माझ्यापासून दुरावला आहात….तुम्ही घाबरला न दिसणाऱ्या संकटाला…
तुमच्या न येण्याने मी अस्वस्थ आहे …बैचेन आहे …तुमच्या येण्याकडे माझे डोळे लागले आहेत ….
तुमचा विरह मला सहन होत नाही……लवकर या…खेळा ….बागडा…हुंदडा..आपल्या जीवनाला आकार द्या… चिमुकल्यांनो आपलं नातं अतूट आहे …कधीच न संपणारं…
नव्या को-या वह्या पुस्तकांचा हवाहवासा वाटणारा तो सुगंध अनुभवायला…हातात पेन्सिल घेऊन अ..आ..ई .म्हणायला…येताय ना..
भीऊ नका…..मीही तुमची काळजी घेईन. खूप दिवस झाले रे तुम्हांला पाहून.. …तुमची आठवण येते…
तुम्हांलाही माझी आठवण येत असेलच ना…तुमची मी वाट पाहतेय…मिञांबरोबर धमाल मस्ती करायला …
मागे आपण रोज भेटायचो…पण मध्येच एक कोरोना नावाचा राक्षस आला …आणि आपण दुरावलो…
चिमुकल्यांनो …पूर्वीसारखे आपले दिवस येतील..मौजमजेचे…तोपर्यंत आपल्याला विरह सहन करावा लागेल.
कोणताही ताण घेऊ नका.काही दिवसांनी आपली भेट नक्कीच होईल.. तुमचं फुलपाखरासारखं बागडणं पहायला मी आसुसलेले आहे …
तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हं…
तुमचीच मैत्रीण,
शाळा