मित्राला सहलीत सहभागी होण्याची विनंती करणारे पत्र लिहा
Answers
"सहलीत सहभागी होण्याचे पत्र"
Explanation:
१०२, पूजा बिल्डिंग,
लक्ष्मण नगर,
मिलनचौक,ठाणे (पू)
मुंबई- ४८८८६६
दि. ९ मे,२०२१
प्रिय निश्चय,
सप्रेम नमस्कार.
कसा आहेस तू? तुझे आई बाबा कसे आहेत? आशा करतो, की तुम्ही सगळे ठीक असणार.
गेल्या आठवड्यात आपल्या शाळेत सहलीला जाण्याची नोटिस आली होती. रमेशकडून कळले की तू सहलीला येणार नाहीस. त्यासाठीच हे पत्र लिहत आहे.
निश्चय, हा शाळेतला आपला शेवटचा वर्ष आणि शेवटची सहल आहे. म्हणूनच, ही सहल आपल्या सगळ्यांसाठी खास आहे. आपल्या वर्गातील सगळेजण सहलीला येणार आहेत. सगळे शिक्षकसुद्धा आपल्यासोबत असतील. आपल्याला तिथे खूप मजा येईल.
मी हैदराबादबद्दल खूप काही वाचले आहे. ते एक सुंदर शहर असून तिथे फिरण्यासाठी खूप ठिकाण आहेत. आपले शिक्षक आपल्याला ते ठिकाण दाखवतील. आपण तिथे खूप मजा करू, हसू खेळू, खूप सारे फोटो काढू.
या पत्राद्वारे मी तुला सहलीला येण्याची विनंती करतो. आशा करतो, की तू सहलीत सहभागी होशील.
तुझा मित्र,
स्वप्निल.
Answer:
I Hope You Help This Answer.