मित्राला तुम्ही पाहिलेल्या जादूच्या खेळाचे वर्णन करणारे पत्र लिहा. किया MEIN InHunisilim
Answers
Explanation:
जादूगार चमत्कार दाखविण्याकरिता भुताखेतांना आवाहन करतो, अशी समजूत जवळजवळ अठरावे शतक संपेपर्यंत होती. त्यामुळे काही जादूगारांवर पूर्वी खटले भरण्यात आले, तर काहींना फाशी देण्यात आले; पण हळूहळू समज दूर होत गेला
जादूटोणा, जारणमारण, चेटूक इ. अतिभौतिक प्रकार व जादूचे खेळ यांमध्ये फरक आहे. जादूटोण्यादी प्रकारांत देवी चमत्कारावर भर असतो; जादूच्या खेळांचे तसे नाही. दैवी चमत्कार व जादूचे खेळ यांचा कोठलाही संबंध नाही. व्यक्तीचे कौशल्य हा जादूच्या खेळांचा पाया आहे व लोकांचे मनोरंजन करणे हे उद्दिष्ट आहे. जादूचे खेळ करणे कलेत मोडते व ही कला प्रत्येक देशात आढळते. भारतात वैदिक काळापासून या कलेसंबंधीचे उल्लेख मिळतात; पण त्यावर संकलित माहिती उपलब्ध नाही.
प्राचीन काळी जादू आणि धर्म या गोष्टी एकरूप होत्या. आदिम जमातींत ही एकरूपता विशेषत्वाने जाणवते. काही प्रगत प्राचीन संस्कृतींतही धर्मश्रद्धा दृढ करण्यासाठी विविध प्रकारच्या उपकरणांचा व क्लृप्त्यांचा उपयोग करून अनेक चमत्कार किंवा अलौकिक घटना करून दाखविण्यात येत. भारतात मंत्र, तंत्र वा हस्तकौशल्य असणाऱ्या व्यक्तींच्या, त्याचप्रमाणे पायिक, कापालिक यांसारख्या पंथीयांच्या किमया व चमत्कार यांचे उल्लेख प्राचीन ग्रंथांतून आढळतात.
बर्लिन म्युझीयममधील कागदपत्रांवरून इ. स. पू. ४००० पासून ही कला अस्तित्वात असावी, असे दिसते. त्यांतील माहितीनुसार डेडी याने कूफू किंवा कीओटस नावाच्या ईजिप्शियन राजाच्या (इ. स. पू. तिसरे सहस्त्रक) उपस्थितीत मुंगसाचे डोके एका पक्ष्याला लावले होते. इंडियन रोप ट्रिकसारख्या जादूच्या अनेक खेळांचा उगम भारतात झाला व नंतर त्याची माहिती इतरत्र झाली, असे काहींचे म्हणणे आहे. गावोगाव फिरून जादूगार जादूचे खेळ करून दाखवित.