मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देणारे पत्र
Answers
PLZ MARK ME AS BRAINIST
Answer:
दिनांक :१.११.२०२०.
अमृता दाते ,
मधुकर पेठ ,
जालना – ५०१३०२.
प्रिय अमृता ,
सर्वप्रथम तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ! यावर्षी तुझा वाढदिवस साजरा करण्यासाठी मी तेथे नाही आहे खरतर या गोष्टीचे मला खूप वाईट वाटत आहे. पण मी तुझ्यासोबत नसले तरी माझे आशीर्वाद कायम तुझ्यासोबत आहेत. वाढदिवस मस्त साजरा कर. दरवर्षी आपण तुझ्या वाढदिवसाला अनाथआश्रमाला भेट देतो आणि तो दिवस अगदी अर्थपूर्ण आणि अतिशय आनंदात जातो. यावर्षीही मी तुला तुझ्या आवडत्या भेट्वस्तूसोबत काही भेटवस्तू अनाथआश्रमातील आपल्या छोट्या दोस्तांसाठी पाठविल्या आहेत.आठवणीने घेऊन जा.
पुन्हा एकदा वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा ! तुला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना . चल तर मग वाढदिवस झाल्यानंतर मला पत्र पाठवायला विसरू नकोस. मी वाट पाहीन.
तुम्ही सर्व कसे आहेत? आपली मिनू कशी आहे ? तुही तुझी काळजी घे. मी दिलेली भेटवस्तू कशी वाटली ?आणि मला तू तुझ्या वाढदिवसाला केलेली मज्जा मस्ती पत्राद्वारे कळव .
पत्राच्या उत्तराची प्रतीक्षा राहील !
तुझी प्रिय मैत्रिण,
वेदा
मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देणारे पत्र-------बाबा