मेंदूचा वायम कशा मुळे होतो
Answers
Answer:
मेंदूत सुमारे १०० अब्ज न्यूरॉन्स असतात. या मेंदूत नेमकं काय घडतं, का घडतं आणि कसं घडतं याबाबत अनेकांमध्ये उत्सुकता असते. मेंदू प्रक्रिया शरीराचा समतोल साधत असते. मात्र मेंदूचे विकार अन् त्याचे कारणही समजून घेण्याची गरज आहे. तोल जाणं, डोकेदुखी असे सर्वसाधारण वाटणारी लक्षणंही मेंदूच्या गंभीर आजाराकडे आपले लक्ष वेधत असतात. त्यामुळे याकडे दुर्लक्ष न करणंच योग्य. हे मेंदूच्या आजाराची अनेक लक्षण असतात. जसं डोकेदुखी, अर्धशिशी, फिट्स, आकडी, लकवा, पक्षाघात, न्युरोपथी, हातापायांना मुंग्या येणं, मानेचं आणि कंबरेचं दुखणं, स्मृतीभ्रंश, कंपवात, मेंदूची गाठ, डोक्याला लागलेला मार, मेंदूचे संक्रमणचा मेंदूच्या विकारांमध्ये समावेश होतो. त्यामुळे हे आजार नेमके काय आहेत हे समजून घेणंही गरजेचं आहे.
मायग्रेन (डोकेदुखी) : मेंदूच्या विकारातील अनेकदा दिसणारं लक्षण म्हणजे डोकेदुखी. तीव्र स्वरूपाची डोकेदुखी, चक्कर, स्त्रयिांना जास्त प्रमाणात, मासिक पाळीत जास्तवेळा हा आजार आढळतो. वेळेवर जेवण, झोप, नियमित व्यायाम आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार हे या आजाराला नियंत्रित करू शकतात
मेंदू - हा प्राण्यांच्या शरीरातील एक गुंतागुंतीचा अवयव आहे. हा अवयव डोक्यामध्ये कवटीच्या आत असतो.
शरीरातील सर्व ऐच्छिक व अनैच्छिक क्रिया मेंदूकडून नियंत्रित केल्या जातात. मेंदूमध्ये सुमारे १०० अब्ज चेतापेशी असतात. मानवी मेंदूची डावी बाजू शरीराची उजवी बाजू नियंत्रित करते
मेंदूतील ज्ञानकेंद्रे, विविध भावना, मेंदूचा विकास, गर्भधारणेनंतर त्याच्या वाढीची स्थिती, मज्जापेशीचे प्रकार, सपाट व गुळगुळीत मेंदू आणि सुरकुत्या असलेला मेंदू यांतील फरक, मेंदू व त्याची प्रतिकार यंत्रणा, मेंदूचे आजार, आत्महत्येचे विचार कसे तयार होतात, भावभावना व्यक्त होताना चेहऱ्याची होणारी हालचाल, गुणसूत्रात होणाऱ्या बदलांमुळे निर्माण होणारी 'हंटिंग्टन' व्याधी, विद्वत्ता आणि मेंदूचा संबंध, डावा व उजव्या मेंदूची कार्यक्षमता, मेंदूची लवचीकता, मेंदूतील लहरी, त्यांची कारणे, चिन्हांची भाषा आणि मेंदू, ऑक्सिटोसिनचे कार्य, मेंदूपेशी व यंत्रपेशी, झोपेचे नियंत्रण, मेंदू व चुंबकीय चिकित्सा आदी मेंदूशी संबंधित विषयांची सर्व माहिती डॉ. चंद्रकांत सहस्रबुद्धे-लिखित गूढ उकलताना या पुस्तकात दिली आहे.