Geography, asked by kunalsavale64, 14 hours ago

१) मृदू खडकांना वळ्या पडतात तर कठीण खडकाला विभंग होतो ​

Answers

Answered by sturheama1366
0

Answer:bird sanctuaryआल्फ्रेड विणकर यांनी मांडलेल्या भूखंड वहनाच्या सिद्धांतानुसार उत्तरेला असणाऱ्या लाॅरेशिया व दक्षिणेला असणारा गोंडवाना या दोन भूमीच्या दरम्यान टेथिसा नावाचा समुद्र पसरलेला होता भूगर्भातील हालचाली उत्तरेकडील लाॅरेशिया व दक्षिणेकडील गोंडवाना या भूमि जवळ येऊ लागल्या व टेथिसा समुद्रांचा तळ घड्यांसारखा वर उचलला जाऊन यापासून हिमालय या घडीच्या पर्वतांची निर्मिती झाली. या हिमालयीन पर्वतावर होणाऱ्या भरपूर पर्जन्य वर्षावामुळे येथे अनेक नद्यांचे उगम झाले.

या हिमालयात उगम पावणार्‍या नद्यांनी खाली मैदानात येतांना आपल्यासोबत बराच गाळ वाहून आणला या गाळापासून भारतातील उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाची निर्मिती झाली. या उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्या दक्षिणेपासून (यमुना नदीच्या दक्षिणेला असणाऱ्या राजमहाल टेकड्या) भारतीय द्वीपकल्प पठारी प्रदेशाला सुरुवात होते. उत्तर भारतीय पठारी प्रदेश व दक्षिण भारतीय पठारी प्रदेश या दोन प्रादेशिक विभागाचा समावेश होतो. दक्षिण भारतीय पठारी प्रदेशातील एक पठार म्हणजे महाराष्ट्र पठार होय. या पठाराची भूमी ही प्राचीन गोंडवानाची भूमी आहे.

तसेच भारताच्या पाच प्राकृतिक विभागांपैकी पश्चिम किनारपट्टी चे प्रदेश व द्विकल्पीय पठारी प्रदेश या दोन प्राकृतिक विभागांचा समावेश हा महाराष्ट्रात होतो.

महाराष्ट्र हा प्राकृतिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण आहे. पश्चिमेला असणारे कोकण किनारपट्टी, भारतातील सात पर्वत प्रणालीपैकी प्रमुख सह्याद्री पर्वत व सातपुडा पर्वत या दोन पर्वत प्रणाली व ज्वालामुखीपासून तयार झालेले महाराष्ट्र पठार अशी महाराष्ट्राची प्राकृतिक रचना आहे.

प्राकृतिक रचना अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहे, कारण प्राकृतिक प्रभाव हा त्या भागावरील हवामानावर होतो.

Explanation:

Similar questions