Physics, asked by sanikamali8941, 9 months ago

मेंदेलिव्हचे आवर्ती नियम लिहा​

Answers

Answered by Aryanshinde1010
8

Explanation:

याने प्रथम ही आवर्त सारणी आधुनिक पद्धतीने मांडली. मेंडेलीवने मूलद्रव्यांना त्यांच्या अणु-वस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडले. त्यानंतर मेंडेलीवने मूलद्रव्यांची आडव्या ओळीत मांडणी करण्यास सुरूवात केली. जर त्याला आधी मांडलेल्या मूलद्रव्याशी साधर्म्य असलेले दुसरे मूलद्रव्य सापडले, तर ते त्याने नवीन ओळीत पहिल्या मूलद्रव्याच्या खाली मांडले. मेंडेलीव्हला अश्या सारणीतून मूलद्रव्यांच्या गुणधर्मांमधील आवर्तानुसारी कल ठळकपणे दाखवायचे होते. काळागणिक जसजशी नव्या मूलद्रव्यांची भर पडत गेली, तसतशी मेंडेलीव्हच्या मूळ सारणीची रचना वाढत वाढत बदलली गेली.

मेंडेलीव्हची आवर्त सारणी जरी तत्कालीन ज्ञात मूलद्रव्यांची मांडणी करण्यात यशस्वी ठरली, तरी कालांतराने, तिच्यामधील काही त्रुटी समोर आल्यात. उदा. एकाच मूलद्रव्याची विविध अणु-वस्तुमान असलेली समस्थानिके मेंडेलीव्हच्या आवर्त सारणीत विविध जागा घेतील, परंतु असे करणे अयोग्य आहे, कारण सगळ्या समस्थानिकांचे रासायनिक गुणधर्म सारखेच असतात.

Similar questions