Biology, asked by karanderaj200578, 5 months ago

मेदांपासून मिळणारी ऊर्जा:-​

Answers

Answered by yabhay2233
0

Answer:

जैवऊर्जा म्हणजे सजीवांपासून मिळणारी ऊर्जा. पृथ्वीवरील सर्व सजीव आपल्या रोजच्या चलनवलनातून आणि हालचालींमधून काही प्रमाणात ऊर्जा निर्माण करतात. प्रत्येक सजीवानुसार त्यांनी तयार केलेल्या ऊर्जेचे प्रमाण वेगवेगळे असते. काही सजीवांमध्ये हि ऊर्जा त्यांच्या हालचाली आणि इतर कामांसाठी वापरली जाते तर काहींमध्ये ती साठवून ठेवली जाते. या साठवलेल्या ऊर्जेचा वापर माणसाने आपल्या उपयोगासाठी करून घेतलेला आहे. वनस्पतींमध्ये ही ऊर्जा कर्बोदके, तैले, प्रथिने आणि अन्य सेंद्रिय रसायनांच्या स्वरूपात साठवली जाते. या ऊर्जेचा वापर करून स्वतःची ऊर्जेची गरज माणूस भागवतो.

जैवभार म्हणजे एखाद्या जैविक पदार्थात साठलेली रासायनिक स्वरूपाची सौर ऊर्जा होय. जैवऊर्जा हि नवीनीकरणक्षम ऊर्जा आहे, म्हणजेच ती पुन्हापुन्हा उपलब्ध होऊ शकते. पृथ्वीवरील बहुतेक सर्व जैव ऊर्जेचा स्रोत सूर्य आहे. सूर्याकडून मिळणाऱ्या प्रकाश व उष्णतेने बहुतेक जैव पदार्थांमध्ये जैवऊर्जा निर्माण होते

Similar questions