मुद्दावरून / शब्दावरून कथालेखन करा.
दोन मित्र
एक विद्यान होणे
व्याख्यान देणे
परगावाचे बोलवणे
अडाणीपणाची धट्टा करणे
पाणी
तुम्हाला पोहता येते का?
तात्पर्य :
एक अडाणी राहणे
नावेतून प्रवास
तेवढ्यात वादळ होणे
आयुष्य फुकट गेले
विद्वानाचे
नावाड्याशी
नावेत
मरा आता.
Answers
Answer:
दोन मित्र’ कादंबरी प्रकाशित झाल्यानंतर ती लगेच आणि मोठ्या प्रमाणात वाचली गेली असेल, असं नाही. मात्र या कादंबरीबद्दल प्रतिक्रिया हळूहळू येत राहिल्या. अनुकूल किंवा प्रतिकूल प्रतिक्रिया हाती येण्यासाठी लेखकाला वाट पाहावी लागते. ‘दोन मित्र’बद्दल चांगलं लिहून यायला लागलं, तेव्हा काही थोड्यांना ही कादंबरी चांगली आणि महत्त्वाची वाटते आहे, असं लक्षात यायला लागलं; तरीही या कादंबरीचा वेगळेपणा (तसा तो असल्यास) जाणकारांना जाणवला असेल की नाही, याबद्दल शंका येत राहिली. ‘दोन मित्र’चं प्रकाशन मुंबईला झालं. त्या दिवशी पाऊस पडत होता. कमीच श्रोते उपस्थित होते. विजया राजाध्यक्ष आणि अरुण साधू प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. किशोर कदम आणि अन्य सहकलाकारांनी कादंबरीच्या काही भागाचं वाचन केलं.
अरुण साधू म्हणाले की, ‘जर हा विषय त्यांना सापडला असता, तर त्यांनी समाजाच्या चेहऱ्यावर आणि छाती-पोटावर त्वेषाने ठोसे मारले असते. सासणे यांनी समाजाच्या चेहऱ्यावर ओरखडे-बोचकारेच काढलेले आहेत. हा विषय अधिक आक्रमक पद्धतीने मांडण्याची गरज होती आणि मी (त्यांनी) तो तसा मांडला असता.’
विजया राजाध्यक्ष यांनी ‘दोन मित्र’वर नंतर ललितमध्ये एक परीक्षणही लिहिलं. त्यांना ही कादंबरी आवडली होती. ‘दोन मित्र’वर चित्रपट निघू शकेल, असं निळू फुले यांना वाटलं. काहीएक आयोजनानंतर त्यांच्याबरोबर चर्चाही झाल्या. चित्रपटनिर्मिती त्यांनाच करायची होती, पण ते काळाच्या पडद्याआड गेले. चित्रपट निघाला नाही. भालचंद्र नेमाडे यांनी दूरध्वनीवरून मला असं सांगितलं की, त्यांना कादंबरी आवडली आहे; मात्र कादंबरीच्या शेवटाबद्दल त्यांना शंका आहे.
कादंबरीचा शेवट जसा केला आहे, तसा करणं ही लेखक म्हणून माझी अनिवार्यता होती. आज ना उद्या समाज पक्व होईल आणि जात-वर्ग इत्यादी बंधनं नष्ट होऊन परस्परांबद्दल मित्रभाव निर्माण होईल, अशा प्रकारचं स्वप्न जपणं लेखक या नात्यानं मला आवश्यक वाटलं. आपण चांगल्या दिवसांच्या येण्याची फक्त वाटच पाहू शकत असतो आणि तसे ते येतील, अशी अपेक्षा बाळगू शकतो. नसता, त्याव्यतिरिक्त, निव्वळ वास्तव मांडणं हा लेखकाचा काही एकमेव हेतू असत नाही. रत्नाकर मतकरींनी मला दीर्घ पत्र लिहून कादंबरी आवडल्याचं सांगितलं. ‘समाजाचा कुरूप चेहरा’ दाखवल्याबद्दल त्यांनी माझं अभिनंदन केलं. याच सुमाराला व त्या आधी ‘राहीच्या स्वप्नांचा उलगडा’ ही माझी कादंबरी प्रकाशित झाली होती. मी ‘सौंदर्यवादाच्या सापळ्या’मध्ये अडकतो आहे, अशी चिंता व्यक्त करून ‘काव्यमय शैलीतील अमूर्त आणि अबोध पातळीवर’ जाणाऱ्या माझ्या कादंबरीलेखनाच्या प्रयासावर त्यांनी एका लेखातून टीका केली होती. व्यर्थ सौंदर्यवादाच्या ‘सापळ्या’त न अडकता मी वास्तव मांडावं, अशी त्यांची सूचना होती. ‘दोन मित्र’ त्यांना आवडली आणि ‘दोन मित्र’मुळे, मला वाटतं, मी पुन्हा ‘वास्तववादी लेखकांच्या गटा’त समाविष्ट झालो.
तुम्ही समाजातील एखाद्या घटकाच्या विरोधात लिहिता, तुम्ही वाभाडे काढता, चाबकाचे फटकारे मारता, आक्रमक भाषा वापरता; तेव्हा तुम्हाला समजून घेणं अवघड नसतं. तुम्ही मारलेले ठोसे योग्यच आहेत, असं बहुतेकांना वाटलेलं असतं. तुम्ही समंजस, मानवतावादी, सगळ्यांना समजून घेण्याची अशी भूमिका घेतली; तर तुमचं लेखन प्रभावी असूनदेखील ‘असली भूमिका’ अनेकांना मान्य न होण्याचा धोका असतो. हा धोका ‘दोन मित्र’च्या निमित्ताने मी घेतला.