मी देव झालो तर.... या विषयावर निबंध लिहा.
Answers
Answer:
‘मला देव भेटला तर’ ही कल्पनाच भन्नाट वाटते. शाळेत निबंध लिहायला सांगतात- ‘मी पंतप्रधान झाले तर’ तसेच काहीसे किंवा परीकथेत सांगतात तश्शी- एका गरीब मुलीला रडताना एक परी आकाशातून पाहाते व तिच्या मदतीसाठी आकाशातून हवेत तरंगत तरंगत- त्या मुलीजवळ येऊन रडण्याचे कारण विचारते. परीला तिची दया येते व परी एक जादूची कांडी हवेत गोल गोल फिरवते. तत्क्षणी ती मुलगी सुरेख दिसू लागते. तिचे कपडेपण छान छान होतात. तिला आनंद होतो व हसू फुटते. तसेच काहीसे मला देव भेटला तर हे ऐकून वाटले – मी क्षणभर डोळे मिटले. मन शांत झाले. एक छोटीशी वाऱ्याची झुळूक आली व अगदी हलके हलके वाटू लागले आणि आणि काय सांगू! स्वर्गातून चतुर्भुज भगवंत माझ्याकडे म्हणजे पृथ्वीवर अवतरताना दिसले. भगवंत तर चराचरात आहेतच. वाटलं त्यांनीच निर्माण केलेल्या या धरतीवर ते का बरे येत असतील? त्यांना काय हवे असावे? नाही नाही, ते मलाच भेटायला येत आहेत! आणि काय आश्चर्य, क्षणात ते माझ्यापर्यंत आलेसुद्धा! मीच गोंधळले होते. विश्वास बसत नव्हता. नुसती टक लावून त्यांच्याकडे पाहात होते. शेवटी तेच म्हणाले- प्रसन्न झालो आहे तुला. हवं ते माग. मला काहीही सुचत नव्हते. भारावून गेले होते.
खरे तर, अगदी आपण बोलू लागतो तेव्हापासून मोठी माणसे लहानांना सांगतात- देवाला नमस्कार कर आणि म्हण ‘मला शक्ती दे’, ‘मला बुद्धी दे’. थोडी मोठी झाली की, ‘माझ्या बाबाला चांगली नोकरी मिळू दे’, ‘माझी तब्येत चांगली ठेव’ वगैरे वगैरे. त्याहून मोठी झाली की, ‘मला परीक्षेत प्रथम क्रमांक मिळू दे.’ तर मला सांगायचे आहे की, बालपणापासूनच देवाकडे मागणे प्रकार सुरू होतो. लगेच आठवण झाली ‘मोलकरीण’मधल्या गाण्याची- ‘देव जरी मज कधी भेटला, माग हवे ते माग म्हणाला’. वाटलं ज्ञानेश्वरांनी पसायदानात विश्वासाठी मागितले, विवेकानंदांनी ‘विश्वशांती’ मागितली तसेच काहीसे माागावे का? ‘नायक’ सिनेमातील अनिल कपूर चोवीस तासांपुरताच मुख्यमंत्री झाला व त्यात त्याने काय काय केले ते दाखवले आहे त्याची आठवण झाली. शेवटी हिय्या करून म्हटले- तुम्ही जेव्हा वसुंधरेवर येत होतात तेव्हा तुम्हाला जाणवले असेल की, पृथ्वी पूर्वीसारखी सुजलाम सुफलाम राहिलेली नाही. सगळीकडे भ्रष्टाचार, जंगलतोड व त्या जागी नवीन सिमेंटची जंगले, त्यामुळेच पाण्याचा झालेला हाऽऽहाऽऽकार, लादेन, दाऊदसारखी राक्षसी वृत्तीची माणसे, जिकडेतिकडे बंडखोरी, माणसे माणसाला विचारत नाहीत. हा सर्व अतिरेकीपणा नाहीसा कर आणि रामराज्य पुन्हा एकदा निर्माण कर, अशी भगवंताला मनापासून विनवणी, प्रार्थना केली.