मोठ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
देणारे पत्र लिहा
Answers
३,स्वामीसमर्थ सदन,
दर्शननगर,
पुणे-४११०२९
दिनांक: - 24 अगस्त 2020
प्रिय दादा,
सादर नमस्कार.
तू कसा आहेस?आई बाबा कसे आहेत?मी इथे खुश आहे.मला तुमची खूप आठवण येत आहे.
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुला आयुष्यात खूप यश मिळो.तू नेहमी सुखात रहा, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते.आईच्या पत्राद्वारे कळाले की यावेळी तू तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी खूप मजा व धमाल केली.तुझे बरेच मित्र घरी आलेले. तू खूप मोठी पार्टी घरी दिलीस. मला ही या पार्टीमध्ये सहभागी व्हायचे होते,परंतु परिक्षेमुळे मला ते जमले नाही.
मी तुझ्या वाढदिवसाला येऊ शकली नाही,या गोष्टीबद्दल मला वाइट वाटते.मी आता दिवाळीच्या सुट्टीत घरी येईल,तेव्हा आपण खूप मजा करू.
पुन्हा तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.नेहमी खुश रहा. सोबत तुझ्यासाठी भेट पाठवत आहे.
आई बाबांना माझा नमस्कार सांग.
तुझी लाडकी बहीण,
वेदांक
Answer:
तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस, तुझ्या या खास दिवशी, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊराया. तर माझा चांगला मित्र आणि मार्गदर्शक देखील आहेस. तुझा पाठिंबा हेच माझ्या यशाचे कारण आहे. ... माझ्या आयुष्यातील पहिला आणि अजूनही माझा सर्वात जवळचा मित्र असणाऱ्या माझ्या भावाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.