. माध्यमभाषया उत्तरं लिखत । १. वीरबलेन चौरः कथं गृहीतः ?
Answers
Answer:
Birbal gave each servant a stick of the same length. He told them that these were magical sticks and the stick of the thief will automatically become a finger long. The servant who had stolen the purse became afraid and at night he cut his stick a finger to protect himself. The next day the thief was caught since only his stick was shorter; then the thief also admitted his theft and returned the purse. In this way Birbal caught the thief gave got back the money purse of Devadatta.
HOPE IT HELPS..............
PLZ MARK AS BRAINLIEST AND ALSO FOLLOW................
ALSO THANK MY ANSWER AS MUCH...............
Answer:
बिरबल हा सम्राट अकबराचा अतिशय चतुर आणि हजरजबाबी मंत्री होता. त्याच्या चातुर्याच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. त्यांपैकीच एक म्हणजे ‘सुगृहीत: चौर:’. बिरबलाने स्वत:च्या चातुर्यान कसा चोर पकडला, याबाबत ही गोष्ट आहे.
देवदत्त नावाच्या एका श्रीमंत माणसाची पैशाची पिशवी चोरीला गेल्यावर तो आपल्या सेवकांवर संशय घेतो. आपल्या सहा सेवकांपैकीच कोणी एक चोर असणार, याची त्याला खात्री असते. चोराला पकडण्यासाठी तो आपल्या मित्राकडे म्हणजे बिरबलाकडे मदत मागतो. त्यानुसार एके संध्याकाळी बिरबल त्या सहा नोकरांना आपल्या घरी बोलावून समान उंचीची एकेक काठी देतो.
त्या काठ्या जादूच्या असून तुमच्यापैकी जो कोणी चोर असेल, त्याची काठी अंगठ्याएवढी लांब होईल, अशी भीतीही दाखवतो. आपापल्या काठ्या घेऊन दुसऱ्या दिवशी सकाळी यावे असे तो सेवकांना सांगतो. सहापैकी पाच चोर रात्री निश्चिंतपणे झोपतात. मात्र खऱ्या चोराच्या मनात भीती निर्माण होते.
आपली काठी अंगठ्याएवढी लांब होऊन आपली चोरी उघडकीस येण्यापेक्षा अगोदरच काठी कापलेली बरी, असा विचार करून तो काठी कापतो. दुसऱ्या दिवशी बिरबल एकच आखूड काठी बघून चोराला ओळखतो आणि त्याला पकडतो. खजील झालेला चोर क्षमा मागतो आणि पैशाची पिशवी परत देतो.
माणसाची मानसिकता कशी असते हे बिरबल जाणत होता. चोराच्या मनात चांदणे याचा अर्थ जाणून बिरबलाने सर्व साधले. खरा चोर स्वत:ची चोरी उघडकीस येणार नाही यासाठी नक्कीच प्रयत्न करेल. मनुष्याची हीच मानसिकता लक्षात घेऊन बिरबलाने युक्ती केली. अशा प्रकारे केवळ आपल्या युक्तीच्या जोरावर बिरबल चोराला पकडण्यात यशस्वी होतो.