२. माध्यमभाषया उत्तरत।
अ) भूमाता पृथुवैन्यं किम् उपादिशत् ?
Answers
फरवरी मासे सामान्यतः ------------------ दिनानि भवन्ति।
Answer:
आद्यकृषक: पृथुवैन्यः हा पाठ म्हणजे पृथु राजाच्या कृषिविषयक कार्याचा प्रारंभ व त्याचा विकास याचा इतिहास स्पष्ट करणारी आख्यायिका आहे. एकदा पृथु राजा त्याच्या राज्यात फिरत असताना त्याने प्रजेला दयनीय अवस्थेत पाहिले. त्याच्या राज्यातील लोक हलक्या प्रतीच्या अन्नामुळे क्षीण, अशक्त झाले होते. हे पाहून राजाचे मन द्रवले व तो चिंताग्रस्त झाला. पुरोहितांच्या सांगण्यानुसार त्याने पृथ्वीमधून धन-धान्य बाहेर काढण्याकरिता धनुष्य सज्ज केले. तेव्हा पृथ्वीने स्वी-रूप धारण केले व राजाला कृषिकार्य करण्याचा आदेश दिला. भूमातेने नांगर, कुदळ, फावडे, कोयता या उपकरणांच्या साहाय्याने राजाला कृषिकार्य करण्यास सांगितले. भूमातेने राजाला त्याच्या अन्यायी वडिलांचा संदर्भ दिला तसेच त्यावेळी राजाच्या सदाचरणाचे कौतुक केले आणि राजाच्या कृषिकार्यावर तिची कृपा होईल, असे आश्वासन दिले.