६.माधवराव पेशवे यांनी निजामा
बरोबर जिंकलेल्या लढाईचे बीड
जिल्ह्यातील ठिकाण
Answers
Answer:
tgtgyihgcvchhhccc vvvbhbjumd
Answer:
माधवराव पेशवे म्हणजे मराठा साम्राज्यातील चौथे कर्तबगार पेशवे.
पानिपतच्या युद्धानंतर काही दिवसातच नानासाहेब पेशवे मरण पावले व पेशवे पदाची जबाबदारी माधवरावांवर आली.
माधवराव पेशवे असताना निजामाने पेशव्यांकडील काही कर्तबगार सरदार, प्रतिनिधी यांना फोडून पुण्यावर चाल केली. निजाम पुण्यावर चाल करून येत आहे असे कळताच माधवरावांनी निजामाच्या प्रदेशावर हल्ले चढवायला सुरुवात केली.
निजामाला ही बातमी समजताच तो आपल्या प्रदेशात परत जाऊ लागला. निजाम माघारी परत येतोय असे कळल्यावर माधवरावांनी गनिमी कावा करून निजामास वाटेतच अडवले. जेथे निजाम आणि माधवरावांचे सैन्य समोरासमोर आले आणि पुढे त्यांच्यात युद्ध झाले ती जागा किंवा ते गाव होते, 'राक्षस भुवन'.
राक्षस भुवन हे गाव बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात आहे. राक्षस भुवन आच्या या लढाईत माधवरावांनी निजामाचा दारुण पराभव केला.