मी वृक्ष बोलतो मराठी निबंध
Answers
Answered by
6
■■"मी वृक्ष बोलतो"■■
मुलांनो,जरा ऐकता का?मी वृक्ष बोलत आहे.मघापासून तुम्ही खेळत आहात, बागडत आहात. हे पाहून मला आनंद झाला.
आता तुम्ही माझ्या सावलीत बसला आहात म्हणून मी बोलत आहे.माझी गोष्ट ऐकाच.तुमच्या पणजोबांनी येथे बी रुजवले.तेव्हा माझा जन्म झाला.
त्यांनी मला वाढवले. मी खूप उंच झालो.अगदी डेरेदार बनलो.माझ्या अंगाखांद्यावर पक्षी बागडतात. वाटसरू माझ्या सावलीत बसतात.
माझ्यामुळे पाऊस पडतो.पर्यावरण चांगले राहते.मी तुम्हाला फुले-फळे देतो. मी तुम्हाला शुद्ध हवा देतो.
पण,काही लोक आम्हाला तोडतात, ते चूक आहे.आम्हाला तोडले, तर तुम्हाला शुद्ध हवा मिळणार नाही,पाऊस पडणार नाही,जमीन कसदार राहणार नाही.यात तुमचेच नुकसान आहे.
मुलांनो,तुम्ही तरा आमची काळजी घ्या. मी तुमचाच मित्र आहे.
Similar questions