मी विद्यार्थी बोलतोय
Answers
Answer:
मी विद्यार्थी बोलतोय...
डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती, म्हणजेच १५ ऑक्टोबर हा दिवस ‘विद्यार्थी दिन’ म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं, आजचा विद्यार्थी त्यांना अपेक्षित असलेला आहे का? असा प्रश्न ‘युवा कट्टा’वर थेट विद्यार्थ्यांनाच विचारण्यात आला. शिक्षण घेताना येणाऱ्या अनेक अडचणी, पराकोटीची स्पर्धा, गुणवत्तेची न होणारी कदर अशा अनेक समस्या यावेळी विद्यार्थ्यांनी मोकळेपणाने मांडल्या.
शिक्षणाकडे सध्या लोकांचा कल वाढलेला आहे. पुढे स्पर्धा ,भ्रष्टाचार हे आलंच. शिक्षणाला कीड लागत चाललीय हे खरंच आहे. आपली महाराष्ट्रातील,भारतातील मुलं परदेशात शिक्षणासाठी, नोकऱ्यांसाठी जातात. आजचे विद्यार्थीच उद्याचे भविष्य आहे हे आपण त्यांना दाखवून दिलं पाहिजे. पण शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल करणं आता आवश्यक आहे. यासाठी तरुणाईनेच एकत्र येण्याची गरज आहे.
Answer:
कोणतीही गोष्ट शिकत असलेल्या व्यक्तीला विद्यार्थी म्हणतात. विद्यार्थी या शब्दाची फोड - "विद्या"+"अर्थी".
अर्थ् (अर्थयते) हा संस्कृतमधील १०व्या गणाचा धातू आहे. ज्याचा अर्थ आहे - मिळवण्यासाठी प्रयत्न करणे, इच्छा करणे. त्या धातूपासून अर्थिन् म्हणजे मिळवण्याची इच्छा कराणारा, त्यासाठी प्रयत्न करणारा, हे विशेषण होते, नामाशी संधी होण्यापूर्वी अर्थिन् चे अर्थी होते. त्यामुळे विद्यार्थी म्हणजे विद्या मिळवण्याची इच्छा करणारा. विद्यार्थी हा बालक, किशोर, युवा, प्रौढ किंवा वृद्ध अशा कोणत्याही वयाचा असू शकतो. तो सामान्यतः शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ किंवा इतर ठिकाणांहून ज्ञानार्जन करीत असतो. एखादा व्यक्ती ही आजन्म विद्यार्थीसुद्धा असू शकते, कारण ती आयुष्यभर काहीना काही शिकतच असते.
'अर्थी' शब्दान्ती असलेले अन्य शब्द : करुणार्थी, दयार्थी, दानार्थी, प्रेमार्थी, सेवार्थी, ज्ञानार्थी, वगैरे.
विद्यार्थी या शब्दाचा अर्थच मुळी ज्याला जाणून घेण्याची इच्छा आहे व जो जिज्ञासू आहे असा होतो .प्रत्येक व्यक्ती हा जीवनात अगदी जन्मापासून मरेपर्यंत विद्यार्थी असतो . विद्यार्थी हि संकल्पना फक्त शालेय जीवनाशी किंवा महाविद्यालयीन जीवनाशी संबंधित नाही , तर प्रत्येकाला काही न काही तरी जाणून घ्याचे .