मौयकालीन मनोरंजन आणि खेळाची साधने कोणती होती
Answers
Explanation:
त्येक व्यक्तीस सामान्यतः आपल्या दैनंदिन जीवनातील काही ठराविक वेळ उदरनिर्वाह आणि कौटुंबिक जबाबदा-या यांच्या अनुषंगाने विशिष्ट कामकाजामध्ये व्यतीत करावा लागतो. सर्वसाधारणपणे पुरूषास नोकरी वा व्यवसाय, गृहिणीस घरकाम, मुलांना शाळा-अभ्यास यांसाठी दिवसाचा ठराविक वेळ द्यावा लागतो. तद्वतच निद्रा-आहारादी दैनंदिन बाबीमध्येही काही वेळ जातच असतो. या व्यक्तिरिक्त व्यक्तीच्या वाट्याला काही फुरसतीचा वा फावला वेळ येतो. तो वेळ ती व्यक्ती आपल्या आवडीनिवडीच्या अशा गोष्टींमध्ये स्वेच्छेने घालवू शकते, की ज्यायोगे मनास विरंगुळा वा आनंद लाभेल. अशा प्रकारे श्रमपरिहार, मौज किंवा आत्मप्रकटीकरण यांसारख्या सुप्त प्रेरणांनी केल्या जाणाऱ्याव फावल्या वेळातील कृतीची गणना मनोरंजन या सदराखाली करता येईल.त्यात निरनिराळे छंद, खेळ, नाटक-चित्रपटादी करमणुकीची साधने, लेखन-वाचनाही सवयी इत्यादींचा अंतर्भाव होतो.
उत्तम प्रतीचे निखळ मनोरंजन हे व्यक्तीच्या शारीर-मानसिक स्वास्थास पोषक असते. रोजच्या धकाधकीच्या आणि चाकोरीब्ध जीवनातील शिणवठा व कंटाळा दूर करून मनाला नवचैतन्य व ताजेपणा आणि शरीराला जोम व कार्यशक्ती मिळवून देण्याचे प्रयोजन उत्तम मनोरंजनाद्वारे विनासायास साधले जाते. या दृष्टीने मनोरंजनाच्या कोणत्या प्रकारमध्ये व्यक्ती रममाण होते, ह्यालाही महत्व आहे. निरनिराळे छंद वा खेळ यांची जोपासना केल्याने व्यक्तीच्या सुप्त गुणांना वाव मिळून व्यक्तीमत्वाचा विकास साधला जातो. अशा प्रकारे समाजातील बहुसंख्य व्यक्तींना आपापल्या आवडीनिवडी आणि छंद जोपासण्यास पुरेसा अवसर व संधी मिळून त्यांची अभिरूची संपन्न होत गेल्यास त्यायोगे एकूण समाजाचाच सांस्कृतिक स्तर उंचवण्यास मदत होते.
तसेच मनोरंजनातून प्रायः व्यक्तीच्या मनाचे आरोग्य सांभाळले जात असल्याने पऱ्यायाने समाजातील गुन्हेगारीला काहीसा आळा बसू शकतो. सार्वजनिक ठिकाणी मनोविनोदनार्थ अनेक व्यक्तींच्या एकत्र येण्यातून त्यांच्यामध्ये खेळीमेळीचे परस्परसंबंध जोपासले जातात व निकोप, स्वास्थ्यकारक समाजजीवनाच्या दृष्टीने ते लाभदायक ठरते. आधुनिक काळात तर मनोरंजनाची गरज वाढत्या प्रमाणावर प्रकर्षाने