History, asked by bhagyshrishende, 4 months ago

मगधचा राजा कोण होता ?​

Answers

Answered by kedar4406
0

Answer:

मगधप्राचीन भारतातील इतिहासप्रसिद्ध प्रदेश. या प्रदेशाच्या भूसीमा वेळोवेळी बदलत गेल्या असल्या, तरी विद्यमान बिहार राज्यातील नालंदा, औरंगाबाद, हाजीपूर, बिहारशरीफ, गया, पाटणा, ससराम या जिल्ह्यांतील भूभाग या प्रदेशात सामान्यपणे अंतर्भूत होता असे म्हणता येईल.

मगध नावाच्या व्युत्पत्तीविषयी वि. का. राजवाडे यांनी ‘मगान् दधाति इति मगधः’ (मग लोकांना धारण करणारा देश) असे म्हटले असून ‘मग’ म्हणजे शाकद्वीपातील (मध्य आशिया) ब्राह्मण होत. ते ज्या देशात येऊन राहिले तो मगध देश.

मगधचा उल्लेख कधी भौगलिक प्रदेश म्हणून, तर कधी साम्राज्य म्हणून, तर कधी एक महाजनपद म्हणून प्राचीन संस्कृत व पाली वाङ्मयात, विशेषतः वैदिक वाङ्मय,रामायण, महाभारत, बौद्ध साहित्य व पुराणे यांत येतो.

तसेच मीग्यॅस्थिनीझ, फाहियान, ह्यूएनत्संग यांसारख्या प्रवाशांच्या प्रवासवर्णनांतून आढळतो. अंगुत्तर निकायातील निर्देशानुसार बुद्धाच्या वेळी जी सोळा महाजनपदे होती, त्यांपैकी मगध हे एक होय. ऋग्वेदात मगधाचा उल्लेख ‘कीकट देश’ या नावाने केला आहे; पण अथर्ववेदात मगध असाच स्पष्ट उल्लेख आढळतो; पण तो काहीसा अवहेलनात्मक आहे. त्यावरून वैदिक आर्यांच्या प्रभावाबाहेर हा प्रदेश असावा, असे वाटते.

बौद्ध साहित्याच्या सर्वांगीण अभ्यासानंतर टॉमस विल्यम रीस डेव्हिड्झ (१८४३-१९२२) या प्रख्यात प्राच्यविद्या पंडितांनी मगधाच्या चतुःसीमा पुढीलप्रमाणे सांगितल्या आहेत : पूर्वेस अंग देश, पश्चिमेस शोण नदी, उत्तरेस गंगा आणि दक्षिणेस छोटा नागपूरचे पठार. जैन ग्रंथांतही मगधाचा पवित्र जनपद म्हणून उल्लेख आहे.

जैन तत्त्वज्ञान व आचार धर्म यांचे पालन मगधात चांगल्या प्रकारे होत असल्याचा उल्लेख निशीथसूत्रात मिळतो. वैदिक वाङ्मयात पूर्व दिशेस व्रात्यांचे प्रियधाम म्हटले आहे. त्यांचा वेदप्रामाण्यास व पशुहिंसेला विरोध होता. जैन तीर्थकरांपैकी वीस तीर्थकरांचे निर्वाण मगधातच झाले. या भागात यती, बौद्ध इ. वैदिकेतर पंथ व धर्म अधिक प्रभावी होते. त्यामुळे मगध ही व्रात्यांची पुण्यभूमी आणि वैदिक ब्राह्मणांची पापभूमी अशी कल्पना रूढ झाली. ‘मग’ शब्दाचा अर्थही दोष अथवा पाप असाच शब्दकल्पद्रुमात आढळतो.

मगधचा प्राचीन इतिहास आख्यायिकांतून आणि पौराणिक

Answered by bhagyashreehappy123
1

Answer:

धनानंद

i think i have help you

Similar questions