India Languages, asked by sssatpute06, 2 months ago

magni patra
in marathi​

Answers

Answered by reeyamahanta
6

Explanation:

ज्ञान हेच सामर्थ्य” कावेरी पुस्तकालय, राणे चौक, शनिवार पेठ, गाळा नंबर 4, पुणे 30.

शिवजयंती निमित्त खास आकर्षण प्रत्येक पुस्तकावर 25% सूट

सवलत दिनांक: 10 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी

वेळ: सकाळी 9 ते रात्री 9

ग्रंथालय प्रतिनिधी या नात्याने संबंधित व्यक्तीला शाळेसाठी पुस्तकांची मागणी करणारे पत्र लिहा.

मागणी पत्र लेखन मराठी

दिनांक 10 फेब्रुवारी 2021.

कावेरी पुस्तकालय,

राणे चौक,

शनिवार पेठ,

गाळा नंबर 4,

पुणे 30.

विषय: ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी करणे बाबत.

महोदय,

मी दा.म.शास्त्री, म्हात्रे विद्यालय सातारा. शाळेचा ग्रंथालय प्रतिनिधी(ग्रंथपाल) मी आपणास शाळेच्या वतीने पुस्तकांची मागणी करणे बाबत पत्र पाठवत आहे. आजच्या दैनिक वर्तमानपत्रामध्ये आपल्या पुस्तकालयाची जाहिरात वाचली. आपली शिवजयंतीनिमित्त देण्यात आलेली खास सवलत प्रशंसनीय आहे. जाहिरातीमध्ये शिवजयंतीनिमित्त देण्यात आलेली पुस्तक खरेदी वरची खास सवलत पाहून आम्ही आपल्या पुस्तकालयातून काही पुस्तके खरेदी करू इच्छित आहोत. पत्रासोबत काही निवडक पुस्तकांची यादी पाठवत आहे. आशा आहे कि ही सर्व पुस्तके आपल्याकडे उपलब्ध असतील.

कळावे

आपला नम्र

दा. म. शास्त्री (ग्रंथपाल), म्हात्रे विद्यालय, सातारा 415508.

Similar questions