महामार्गावरील फलकाचे आत्मकथन
Answers
Answered by
6
दोन मोठ्या शहरांना जोडणारे मोठाले रस्ते म्हणजे महामार्ग होय. महामार्गावर असलेल्या मोठ्या पात्या ह्या वाहनचालकांसाठी असतात. पण त्याकडे लक्ष कोण देत ?
त्यातलीच ही एक फलकाची कथा.
मित्रांनो मला ओळखलत का ?
तुम्हाला जागरूक करणारी, तुमचा वाहनावरील ताबा नियंत्रित करणारी अशी मी बिचारी पाटी. पुढे वळण आहे, अती घाई संकटात न्हेई, वेगमर्यादा सांभाळा, पुढे बोगदा आहे, ठेवा वेगावर नियंत्रण, सावकाश जा, पावसात वाहन हळू चालवा असे कितीतरी फलक तुमच्या माहितीसाठी असले तरी तुम्ही माझ्याकडे कानाडोळा करता आणि आपल्या जीवाशी खेळता. ऊन, वारा, पाऊस ह्या कशाची पर्वा न करता मी तुम्हाला मार्गदर्शन करत असते तरी तुमच्या वेंधळेपणा मुळे संकट ओढवून घेता. अपघात बघून माझे मन हेलावते पण उभ राहून मार्गदर्शन करण्याशिवाय मी काही करू शकत नाही.
Similar questions